Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

मी मनातच समर्थांना बोल दिले. ”मालिक आपणच माझी लाज राखलीत.” पुनश्च काही दिवसानंतर सर्व सेवेकरी मालाडला आले अन गळ घालू लागले,”तुम्ही सर्वांना …

दरबारची सुरुवात कशी झाली…. प्रत्यक्ष सद्गुरु मुखातील प्रणव !!! अनंतांच्या संदेशानुसार ॐकारांनी पंचवीस अवतार कार्य नटवली. परंतु ॐकारांच्या पाठीमागे अनंत होते. सर्व …

अनंतांनी संदेश दिले, आम्हाला संदेश मिळाले, पूर्वी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की हे अनंतांचे संदेश आहेत. प्रथमावधित गुरुदेव वशिष्ठ देखील प्रगट …

ठेविले अनंते तैसेची रहावे। चित्ती असू द्यावे समाधान।। आपले सद्गुरु जे आपल्याला सांगत असतात त्याची छाननी करणे, उजळणी करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य …

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

स्थान निर्माण …©️

स्थान निर्माण …©️

मी मनातच समर्थांना बोल दिले. ”मालिक आपणच माझी लाज राखलीत.” पुनश्च काही दिवसानंतर सर्व सेवेकरी मालाडला आले अन गळ घालू लागले,”तुम्ही सर्वांना मार्गदर्शन करता, अडलेल्यांना संकटातून सोडविता, तुमच्याजवळ एवढे ज्ञान आहे, तुमच्याजवळ इतकी शक्ती आहे, मग हे सर्व तुम्ही लपवून का ठेवता?” आता तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करा. अन हे सर्व करण्यासाठी माझी खोली दिली पण मूळ मला इथे आणले कोणी तर भगवान काटे! सर्व व्यापातून मुक्त होऊन तो भक्ती मार्गाला लागला. नंतर आम्ही नोकरीतून निवृत्त झालो अन हेच सांभाळू लागलो. पण तुम्हीच सांगा सुरुवातीला कोणाला तरी कल्पना होती का की या आसनाची व्याप्ती किती वाढेल? सुरुवातीला इथे आल्यानंतर इतके चमत्कार सुरू झाले की विचारता सोय नाही. हे आसन अगदी गाळातून वर आले आहे. आम्ही प्रवचन करण्यास सुरुवात केली की पिशाच्च घुमण्यास सुरुवात होत असे अन त्यांचा नाश करण्यातच वेळ जात असे. असे हे सर्वस्वी चमत्कार अनंतांनी घडविले. त्यांनी या शक्तीची जाण करून दिली. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानांतर होऊन शेवटी पांडू बुवांच्या खोलीत स्थिरावलो. (अनंतांना काही कर्तव्य करून घ्यायचे होते म्हणून त्यांनी आमची निर्मिती केली)अन इतर मानवांना अन मानवांकरवी हे सर्वस्व उजेडात आणले. अशा तऱ्हेने या स्थानाची निर्मिती झाली…©️

You cannot copy content of this page