अनंतांनी संदेश दिले, आम्हाला संदेश मिळाले, पूर्वी मात्र आम्हाला हे माहीत नव्हते की हे अनंतांचे संदेश आहेत. प्रथमावधित गुरुदेव वशिष्ठ देखील प्रगट नव्हते. वेगवेगळ्या नामाभिमानाने आमच्याप्रत स्थिती होत असे. सुरुवातीला त्रिगुणांनी देखील खूप बनविण्याचा प्रयत्न केला, परंतु आमची श्रद्धा ठाम असल्याने त्यांना शक्य झाले नाही. अनंतांनी त्यांचा हा हेतू साध्य होऊ दिला नाही. विश्वामित्राने देखील या आसनाला भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न केला, त्यालाही त्यात यश मिळाले नाही. अनंतांचे संरक्षण असल्याने, आमच्यासारख्यांचा नाश करणे त्याला जमले नाही.
अनंताची कृपा असल्याने आमचा काटा काढणे अघोरांना शक्य झाले नाही. पुष्कळ बिकट प्रसंगातून अनंतांनी आम्हाला वाचवून घेतले आहे. लहानपणापासून बरेच शारीरिक त्रास, मानसिक त्रास भोगावे लागले, परंतु सर्वातून अनंतांनी कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने, तऱ्हेने मुक्त केले. याला सर्वस्वी कारण अनंत! कारण पुढे काय घडण घडणार आहे याची त्यांना कल्पना होती, आम्हाला नव्हती.
आम्हाला लहानपणापासून संरक्षण कोणाचे तर आमच्या मातेचे! आमच्या मातेने आम्हाला घडवले. आचार, विचारांची घडण सर्वस्व मातेने घडविली. तिचे आमच्यावर पूर्णत्व लक्ष होते. आमची माता देखील आमच्या वडिलांना घाबरत असे कारण ते होतेच चिडखोर! हे सर्व सांगण्याचा उद्देश एकच, की तुम्हाला मूळ कळावे. माझ्याकडून त्यांना काही कर्तव्य करून घ्यायचे होते, अनंतांना माहीत होते ही ज्योत कोण आहे अन कदाचित गुरुदेवांना माहीत होते की ज्योत कोण आहे? परंतु त्यांनी देखील आम्हाला शेवटपर्यंत अंदाज दिला नाही. ©️
