Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

नामस्मरण कशाला म्हणतात? ©️

नामस्मरण कशाला म्हणतात? ©️

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा त्याग करावा लागत नाही. मुलामाणसात रहा आणि जो काही उर्वरित वेळ मिळेल तो माझ्या नामात घालवा अन मला डोळे भरून पहा. हे दोघांचे एकदा समीकरण केले की पाचवा प्रणव प्रगट होईल.

एकदा का पाचवा प्रणव प्रगटला की सर्वस्वाचा शोध घेऊ शकता. सर्वस्वाचा अंत सत भक्तीने लावला जाऊ शकतो. भक्तीत अहंकार सापडणार नाही तर लीनत्व सापडेल. या राजामार्गामध्ये काय पाहिजे तर लीनत्व !

गुरुदेव कसे आहेत, तर अत्यंत लीन अन अफाट शक्ती! साक्षात सताने निर्माण केलेले चैतन्य देखील गुरुदेवांचे आदेश पाळतात यावरून समजा गुरुदेव किती महान तत्व आहे! भक्ती अभक्तीत लीन होणार नाही अन अभक्ति भक्तीत लीन होणार नाही. ज्या अखंड नामावर आपण भगवंताचे स्मरण करीत असतो त्याला नामस्मरण म्हणतात, त्या नामस्मरणात त्रिभुवन व्याप्त शक्ती भरलेली आहे. त्या भक्ती पुढे कोणाचे काही चालणार नाही. अन अशा या नामाचा नाश करण्याचे सामर्थ्य त्रिभुवनात कोणाकडेही नाही. या नामाचा नाश हे तपस्वी करू शकणार नाही. हे नामदेखील तपसव्यांकडे होते, नामरहीत ते नव्हते. नामानेच ते तपस्वी झाले पण त्यांच्याकडे अहंकार होता. एक भक्ती अहंकार रहीत तर दुसरी भक्ती अहंकारयुक्त! ऋषीमुनी, गुरुदेव, सप्तऋषी यांची भक्ती तर अहंकार रहीत ! तर इतरांची भक्ती अहंकार युक्त! अहंकारात षडरिपू रुजलेले असतात. भक्तीच्या पुढे ते काही करू शकत नाहीत. ©️

You cannot copy content of this page