Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – प्रारब्धाप्रमाणे,पूर्व संचितानुसार त्यांनी आम्हाला आपल्या सानिध्यात घेतले आहे, अशा त्या माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी हे मना …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – शरीर मन सोडून नाही आणि मन शरीर सोडून नाही. शरीराला त्रास झाला तर मनाला त्रास …

“तुरत दान महापुण्यम” नाही. पुढे ही ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन हाच राजमार्ग …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपणाला माहित आहे कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे करून नाश केला. त्या …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – ही भक्ती इतकी अत्यंत श्रेष्ठ आहे की त्याची योग्यता ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र, याबरोबर तुम्ही करू शकत …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आपण पाहतोच की आपल्याकडे काही मानवांची शुद्धीकरण स्थिती होत असताना काही बलाढ्य तर काही महाबलाढ्य, …

सर्वस्वाची जाण देणारे तत्व… सद्गुरु ©️

सर्वस्वाची जाण देणारे तत्व… सद्गुरु ©️

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज –

काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू सांगतात हा अभ्यास तुझा तूलाच करावयाचा आहे, परंतु तुमच्या मनात सद्गुरूंबद्दल सद्भावना ओथंबल्याशिवाय बाबा तरी काय करतील? म्हणून कर्तव्य करताना देखील सत तुम्हाला याचा अभ्यास घडवित असते.

अव्यक्ताकडून कर्तव्य घडते ते कसे होते याचा अभ्यास तुम्हाला घडवतात. अव्यक्तांचे प्रणव तुम्ही ऐकता हे देखील तुमचे भाग्यच आहे. जरी तुम्ही ते पाहू शकला नाहीत तरी त्यांचे प्रणव तुम्हाला ऐकावयास मिळतात हे देखील तुमचे भाग्यच आहे. अनंतांचे प्रणव ऐकणे याहून महत भाग्य ते कोणते? असे प्रणव इतरत्र कोठे ऐकायला मिळतील? कोणाला अनुभवता येतील? गुरुदेव पितामहांसारखे परमपूज्य तत्व, सप्त ऋषींचे प्रमुख,यज्ञयागात सर्वश्रेष्ठ, महान महान ऋषी ज्यांच्या पुढे लीन आहेत असे ते तत्व, ते देखील या आसनाप्रत प्रणव देतात मग असे ते आसन आणि त्यावर आरुढ असलेले तत्व सेवेकऱ्यांनो परमश्रेष्ठ नाही का? मग अशा आसानाप्रत, अशा तत्त्वाप्रत मनाने किती लीन राहिले पाहिजे? आणि जर का एकदा मन त्या ठिकाणी लीन झाले, सतमय झाले, सद्गुरुमय झाले, मग आपोआप सर्वस्व त्या ठिकाणी आकारेल. सर्वस्वाची जाण देणारे तत्व दुसरे तिसरे कोणी नसून सद्गुरूच आहेत. याच्या वेगळे जाण देणारे दुसरे कोणीही नाही….©️

You cannot copy content of this page