श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – आकार आणि निराकार यात कोणताही फरक नाही. आकारही तेच आणि निराकारही तेच ! पण लक्षात ठेवा हे कधी ओळखता येईल, ज्यावेळी आपले मन सदभावनेने ओथंबलेले असेल तर ! आकार आणि निराकार हे केवळ आपल्या मनाजवळ आहेत.
आम्हाला देखील या कलियुगामध्ये असे संदेश आहेत की मनाची छाननी करा. मनाचा कस आहे, परंतु सत द्वापार, त्रेता युगासारखा कस नाही. मनाने तो किती ठाम आहे हाच कस आहे.
कोणीही तुमच्यापैकी असा सेवेकरी आहे का की जो हे सांगू शकेल की, बाबा आमचा कस घेऊन मोकळे झाले. परंतु जो जाणकार आहे तो यातले मर्म जाणतो. म्हणून म्हटले आहे, जागेल तो जगेल, सावध तो सुखी ! सद्गुरु तत्त्वच असे आहे की त्याचा थांग कोणालाही लागणार नाही. सेवेकर्यांनी हे मनोमन ठरवले पाहिजे की मला यातले मर्म जाणायचे आहे. ज्यांचा मी सेवेकरी आहे, ज्यांच्या चरणावर मी लिन आहे ते कोण आहेत? त्रिगुणांच्या कारभारावर त्यांची देखरेख आहे, पण ते माझ्या ठिकाणी कसे वास करीत आहेत हे मला जाणले पाहिजे. रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात काय सांगितले आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे।…©️
