Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूंबद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व दिसणार …

भांडते ते अज्ञान भांडते…©️

भांडते ते अज्ञान भांडते…©️

श्री स्वयंभू महेश – भगवंताने आकार मानव रूपातच घेतला आहे. काही कुर्म, वराह सुद्धा अवतार झाले आहेत, पण मानवात अवतार घेऊन त्याने जागे केले तरी तो मानव निद्रिस्तच आहे. हे फक्त प्रकृतीचे चाळे आहेत. प्रकृती अंगाने सेवेकर्‍यांनी जाऊ नये. ही माझी इच्छा आहे. प्रकृती भिन्न आहे म्हणून सांगत आहे.

भिन्न भिन्न प्रकृती | कर्मभेदे दिसती || प्रकृती भिन्न आहे. मानवाने विचाराने त्यांना नावे ठेवली आहेत. विचार आणि प्रकृतीला शुद्ध, अशुद्ध बनवले आहे. जर शुद्ध विचार असता तर हा वाद निर्माण झाला नसता. रंग भिन्न असेल पण तो प्रकृतीचा आहे. शिवू नको, विटाळ होईल. हे कोण म्हणते? तर प्रकृती !

मनाने अशुद्ध विचार करतो असा जो मानव आहे त्याला भगवंत सापडला आहे का? जाणणारा असेल तर त्याला हे सर्व एकच आहे. मानवाचे मन फिरते, त्याप्रमाणे मानव फिरतो. मानव त्रिगुणांची उपासना करतात. कोणी विष्णूची, कोणी शंकराची ! म्हणून प्रकृतीचा वाद लागतो. मी सर्वस्व पहात असतो.

भांडते ते अज्ञान भांडते. अज्ञानामुळेच जन्म कर्म होते ! ज्याला स्वयम ज्ञान आहे तो केव्हाही फसणार नाही. आज स्वयमेव शिवाची रात्र आहे. एकच, ॐ कार तत्त्व सर्वभूतेषु पश्य आहे. ते तत्व आहे. आकारात आहे म्हणून पाहता येते. आकारात नसेल तर कोणाचीही पाण्याची हिंमत नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page