Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …

महाशिवरात्र कोणाची? ©️

महाशिवरात्र कोणाची? ©️

श्री कैलासपती स्वयंभू – मी हिमालय पर्वतावर जो बसलो आहे, तो सताच्या आदेशाप्रमाणेच बसलेलो आहे. या ठिकाणी दरबारात आदेश मिळाल्यानंतरच यावे लागते. मग आदेश पाळणे, मानणे हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य नाही का?

जरी माझे नाव स्वयंभू असले, तरी या स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी स्वयंभू आहे म्हणून, मी एक त्यांचा सेवेकरी आहे असे माझे म्हणणे आहे.

महा म्हणजे काय? तर मोठा. मोठा म्हणजे केवढा? म्हणजे वर्णनाच्या पलीकडे, पाहण्याच्या ही पलीकडे जो आहे तोच महा आहे. महाशिवरात्र – हा शिव कोण? अन् त्याची रात्र कोणती?

महा म्हणजे वर्णनाच्या पलीकडे, म्हणून महा म्हटले आहे. शिव म्हणजे जे आहे ते स्वयमेव तत्व ! त्याला कोणी घडविलेले नाही. आकार दिला नाही, पहावयास गेले तर सापडत नाही, असा जो शिव, त्याच्या ध्यानात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मग रात्र काय आणि दिवस काय हे ध्यानात येत नाही. हिच ती शिवरात्र ! असे जे तत्व तेच सत्! हे घडते कसे? तोच उपदेश अंबेला गुरु गीतेमध्ये दिला कसा? ©️

You cannot copy content of this page