श्री समर्थ मालिक – सेवेकरी जसा पाहील तसा त्याला अनुभव देणे होत असते. त्या तऱ्हेने सेवेकऱ्याने पाहिले असेलच. असे कोणी पाहिले आहे का? सेवेकर्याची मनोबुद्धी जशी जाईल तसा त्याला अनुभव द्यावा लागतो. इतकेच की, मन शुद्ध सात्विक स्फटिका सारखे पाहिजे, मग त्या ठिकाणी त्याचे सूक्ष्म खडे असते. ध्यान कोणाचे करावे हे त्याने ओळखावे.
मी कसा आहे कळणार नाही. आकारी आहे की निराकारी आहे. निराकारी आहे, तर प्रणव निघतात कुठून? बोल निघतात कुठून? मग आकारातच मी आहे अन् आकाराच्या रहितपण मी आहे. म्हणून प्रथम काय आहे, कशासाठी आहे, काय करावयास हवे हे सद्गुरु दाखवितात. पण सेवेकर्याची भ्रमंती असते. ती दूर करून गती जरी दिली, तरीही हे सत्य आहे का मिथ्य आहे? पाहतो आहे खरे, असे दिसत आहे. प्राकृत दृष्टीने पाहता येते. इतकेच की, सेवेकऱ्यांनी त्या तऱ्हेने कर्तव्याची दिशा वाढवीत नेली की हे सुद्धा कळेल. (समाप्त) ©️
