Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – सद्गुरु या विषयावर अनेक प्रवचने झाली आहेत. सद्गुरु हेच माझे सर्वस्वाचे निधान असे जर आहे तर भिक्षा मागायला …

श्री समर्थ मालिक – मर्यादा सांभाळली, पाळली पाहिजे. हे सत्य आहे. मर्यादा पाळल्यानंतर ती मर्यादा उपभोगात आणता येते. म्हणून पाळली पाहिजे. तत्त्वाला …

श्री समर्थ मालिक – मायावी दरबार मध्ये जास्त करून लाघवीला अधिकार असतात. एकचित्तात सेवेकऱ्यास अडचणी आल्या म्हणजे सेवेकरी आसनाधिस्तांना सतावतात, पण एकचित्त …

श्री समर्थ मालिक – ज्ञान अनंत तऱ्हेने घेतले पाहिजे. त्याचा उपभोग घेतला पाहिजे. अनंत तऱ्हेने उपभोग घेतला पाहिजे. त्याप्रमाणे बुद्धी चालते. दरबार …

श्री समर्थ मालिक – ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे प्रकाश ! सताचा प्रकाश अन् त्या प्रकाशाच्या अनुसंधानांने सेवेकरी वाटचाल करतात, पण ज्ञान …

श्री विठ्ठल – सद्गुरु चलाख नसतील तर….सद्गुरुंना भोळसट करणारे तत्त्व दुसरे कोणतेही नाही. चलाख बनविणारेही तत्व नाही. ते स्वयमेव तत्व असल्यामुळे ते …

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

गुढ अविद्या जगन्मय…©️

गुढ अविद्या जगन्मय…©️

श्री समर्थ मालिक – सत् संपत्ती दिसत नाही. दृश्य संपत्तीला मानव मोहवून होतो. मोह पाहिजे, पण तो मोह कसा पाहिजे? शुद्ध आणि सात्विक मोह असेल तर अघोर संपत्तीच्या मागे तो लागणार नाही. दृश्य संपत्तीपेक्षा सत् संपत्ती श्रेष्ठ आहे.

मी कोणाला शरण आहे? कोणावाचून काय घडते, धनसंपत्ती कोठून मिळते? ही खूण सापडली तर तो मोहवश होणार नाही. पण ती जर मेख सापडली नाही, तर तो मोहवश होतो.

बाबा – दृश्य संपत्ती कोणा पासून मिळते?

मालिक – सांगतो. सत् कुठे आहे?

बाबा – सत् हे पंचमहाभूतांच्या कवचात आहे.

मालिक – म्हणजे ते हृदयात आहे. हृदयात असल्यानंतर काय करतात?

बाबा – नामस्मरण !

मालिक – आणखी काय करतात?

बाबा – सर्वस्व कार्य करतात. काम करतात. पगार घेतात.

मालिक – कशामुळे?

बाबा – सत् आहे त्यामुळे.

मालिक – सेवेकरी म्हणतो, मी कमवतो. मी करतो. मग कोणाच्या सत्तेने कमावतो? कोणाला वाहतो? अन् हीच ती गुढ अविद्या माया होय. हा जो पडदा टाकला त्या भ्रमंतीमध्येच मानव गुरफटून गेला आहे. दृश्य मायेला लंपट होऊन माझे माझे म्हणत आहे व अदृश्या पासून दूर होत आहे. मात्र ही मेख ज्यांनी ओळखली, त्यांना त्याचे शुभही नाही आणि अशुभही नाही. ते आदेशाप्रमाणे फक्त कर्तव्य करीतच राहणार. बाकी उचापती करीत नाहीत.

या दरबारातील सेवेकरी ज्ञांनी पण आहेत अन् अज्ञानी पण आहेत. ज्ञान देण्यासाठी आसनावरून प्रवचने होत असतात. हे ज्ञानच आहे. ते घेतल्यानंतर प्रश्न उत्तरे पण करतात. बोलणे सोपे असते. परंतु कृतीमान झालेला सेवेकरी दिसतो आहे का? तो मायेच्या व्यापातून निष्काम आहे, असे म्हणू का मी? मग जे गुढ आहे, ते त्याला कळणार नाही. या भानगडीत पडू नये. विचारले ते सांगितले, त्याप्रमाणे प्रयत्नशील असावयास पाहिजे. परब्रम्ह तत्व जरी असले, तरी सेवेकरी माझ्यावर व मी सेवेकऱ्यांवर अवलंबून आहे. सेवेकऱ्यांनी मला जवळ घेतले पाहिजे. असे जर केले तर त्याला दूर लोटता येणार नाही. मी दूर जाणार नाही. ©️

You cannot copy content of this page