Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

काही डोळस आहेत, काही नादातीत आहेत…©️

काही डोळस आहेत, काही नादातीत आहेत…©️

श्री समर्थ मालिक – नामस्मरण हे साधे सोपे नाही. रस्त्याने चालला तरी लहर लागली पाहिजे. लहर लागली तर पावलोपावली चमत्कार करीन. पण सेवेकरी त्याने हुरळून जाईल. परंतु सेवेकर्‍याची मनोभावना तशी झाली, तर हे करावे लागते.

सर्व सूत्राची दोरी माझ्या आधीन आहे. काही डोळस आहेत, काही नादातीत आहेत. डोळस म्हणजे सानिध्यात घेतलेले, नादातीत म्हणजे उपासना करणारे. पण त्यांना दाखवणारा पाहिजे, म्हणजे हे नादातीत डोळस होतील. तेव्हा त्यांना समजेल. पंजा मस्तकावर पडला कि ते डोळस होऊन त्या मार्गाने जातील. अशा तऱ्हेने त्यांना भक्तीची खूण सापडली की मग ते सत् भक्तीच्या गतीने जातील. मग मात्र तीर्थ करण्याची अगर क्षेत्रे भटकण्याची आवश्यकता नाही.

मी कोठे आहे हे त्यांना डोळस झाल्यानंतरच समजेल. हे सर्वस्व कोण करील? तर आकारच करील. अशा तऱ्हेने ॐ कार स्वरूप बनला की मग सत मार्गाने वाटचाल करील. काही मानव आड मार्गाने जातात. लोकांना नादाला लावतात. स्वतःचे स्वहित साधतात, पण या ढोंगाने किंवा चमत्काराने मी कधीही सापडत नाही, मिळत नाही. मला रंग, रूप, आकार वगैरे काही नाही. मग मला कसे पकडतील? मला कसे पाहतील? सेवेकऱ्याने हट्टच धरला तर मी दर्शन देतो की नाही? पण कोणत्या रूपाने, हे मी गुप्त ठेवतो. ©️

You cannot copy content of this page