Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

दृश्य आहे तेच अदृश्य आहे…©️

दृश्य आहे तेच अदृश्य आहे…©️

श्री संत एकनाथ महाराज – आम्ही, माझ्या समर्थांच्या कृपेने त्यांच्या चरणात लीन होतो म्हणूनच गती मिळते. तेच सर्वस्वाचे निधान आहेत. मी, माझे समर्थ जनार्दन स्वामी, त्यांना मी सर्वस्व वाहिले होते. त्याप्रमाणे आमची ठेवण होती. मग दुसरीकडे भटकण्याची आवश्यकता काय?

ज्या आकाराला शरण तेच ॐ कार स्वरूप आहेत म्हणून, ॐ कार बीज मात्रेण | नित्यम् ध्यायंती योगिन: ||कामदम् मोक्षदम् चैव | ॐ काराय नमो नमः ||

ॐ कार हे बीज कसे आहे? तेच ते स्वयं तत्व ॐ कार स्वरूप नटलेले आहे. तेच निर्विकार, निराकार असे आहे. म्हणून आकारातच निराकार आहे. म्हणूनच त्याचे वर्णन होत आहे. ॐ कार बीजाची निर्मिती तिथूनच आहे. ॐ तेच सत् ! सत् तेच ॐ !!

यात आमच्यासारख्या अज्ञानी सेवेकऱ्याने त्या सताच्या लिलेचा अंत, महिमेचा अंत घेण्याची काय जरूर आहे? असतील ते अनंत लीलाधारी ! आम्हाला एकच सापडला आहे, ते म्हणजे वेदांच्याही बा धरीले हाती ! म्हणून त्यालाच हाती धरले, तर बाकीच्यांची आवश्यकता काय? असे ते सत्, तेच सद्गुरु ! तेच स्वयमेव अखंड आहेत !! तेच ज्योतिर्मय, आकारी व निराकारी ही होऊ शकते. दृश्य आहे तेच अदृश्य आहे. पण धरता येत नाही. पाहता येत नाही. कडकडून भेटता येत नाही. असे ते परिपूर्ण आहे. शाश्वत आहे. ©️

You cannot copy content of this page