Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

कोणीही मरत नाही…©️

कोणीही मरत नाही…©️

श्री संत ज्ञानेश्वर – कोणीही मरत नाही. कोणाचाही नाश होत नाही. नासते म्हणावे तर परत जन्माला कसे येते? हे करतो कोण? एकच सत् ! गुरुमाऊली !! ज्यांना कर्तव्य करून घ्यावयाचे असते, तेच उत्पत्ती स्थिती अन् लय करीत असतात. दुसरे कोणीही नाही. बहुत जन्मांचे सुकृत, त्यांची भरपाई झाल्यानंतर ते आपल्या सानिध्यात घेतात. असे ते मालिक आहेत.

सतपुरुषांना, योग्यांना हे जे आहे, ते सर्व अमरच आहेत असेच म्हटले पाहिजे. वृद्धत्व आल्यानंतर, शरीर जीर्ण झाल्यानंतर ते बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर जडत्वाला ताबडतोब उचलतात. कारण घाण लागेल म्हणून ! म्हणून हा सर्व दृश्य अदृश्याचा खेळ आहे. दुसरे काहीही नाही.

दिव्यदृष्टीने पाहिल्यास कोणाचाही नाश होत नाही. अंगावरील वसन फाटल्यानंतर जसे आपण फेकून देतो, तद्वतच हे सारे आहे. यातच ओळखावे. जे दिसत नाही तेच सेवेकर्‍यांनी पाहण्याचा प्रयत्न करावा. ते सद्गुरू शिवाय कोणीही दाखविणार नाही. तेच पांडुरंग ! तेच सर्वस्व !! अनंत रूपाने, अनंत नामाने ते नटलेले आहेत. म्हणून कोणत्या रूपाने त्यांना पहावे? हाक मारावी? ज्या नावाने हाक मारावयाची, ते नाम सेवेकऱ्यांना माहित आहे. ©️

You cannot copy content of this page