Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री समर्थ मालिक – अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य …

अखंड तत्त्वापासूनच ॐ कारांची निर्मिती ©️

अखंड तत्त्वापासूनच ॐ कारांची निर्मिती ©️

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य वगैरे काही नाही. मला कोणीही पाहू शकणार नाही. पाहता येणार नाही. जो पहावयास आला, तो माझ्यातच रममाण झाला. लयबद्ध झाला. मला अनंत हस्त, अनंत चक्षू, अनंत पाद असा मी आहे. माझे वर्णन कोणालाही करता येणार नाही. फक्त भक्तांचे कोड कौतुक पुरविण्यासाठी, आकारी खेळ खेळावे लागतात.

स्वरूपीच लिन होऊन दर्शन होते. आकाराला धरूनच निराकारापर्यंत जाता येते. आकाराशिवाय निराकाराची गती मिळत नाही. एकदम निराकारापर्यंत कोणीही मानव येणार नाही अन् अजून पर्यंत आलेला नाही.

प्रत्येक मानवात माझा वास आहे. मी वास करीत आहे. काही संतांना हे माहित आहे. तिच जाण एखाद्या आकाराकडून माहीत करून घ्यावयाची असते. मग माझे सद्गुरु तेच ! अन् ॐ कारही तेच !

अखंड तत्त्वापासूनच ॐ कारांची निर्मिती आहे. बाकी दुसरे काय? ज्याला कळत नाही त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. मायावीत लपेटलेले आहेत त्यांना ब्रह्मज्ञान सांगण्याची आवश्यकता नाही. सत् असताचे वाद होण्याचे कारण हे सर्व प्रकृतीचे खेळ आहेत. भिन्न काय आणि अभिन्न काय, हे न समजल्यामुळे भीड निर्माण होते. त्या ठिकाणी मी फक्त पाहत असतो. आपणाला पूर्णत्वाने गती आहे की वादविवाद करतो कोण? थोडा तरी मनाला लगाम घालणे हे संदेश आहेत. केवड्याची निर्मिती केतकीच्या झाडावर असते. केवड्याचा सुगंध आला कि मानव त्या ठिकाणी धावतो, म्हणून मोठेपणाला भाळू नका. ऋद्धी सिद्धीला भाळू नका. सत संचिताची तिजोरी साठवून बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ©️

You cannot copy content of this page