Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

पुण्यस्मरण दिन ३३ वा

पुण्यस्मरण दिन ३३ वा

परम् पूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज

परम पूज्य श्री सद्गुरु माऊली भगवान महाराज पुण्यस्मरण दिन – आजचे हे ३३ वे वर्ष असून माऊलींचा हा मानवी तर्हेने आपल्यासाठी विरह दिनच होय. आपण आज तेवढ्या उंचीपर्यंत पोहचलेलो नाहीत अन्यथा हा शब्दप्रयोग येथे करावा लागला नसता. तरी सुद्धा आपण आपल्या श्री सद्गुरु माऊलींनी दाखवून दिलेल्या, बहाल केलेल्या नामस्मरणाने अद्वैत भक्तीच्या राजमार्गावरुन चाललेले आहोत हे ही नसे थोडके ! आजच्या ह्या दिनी जास्तीत जास्त आपण नामस्मरणात राहून आपल्या माऊलींचे दर्शन आपणांस कसे मिळविता येईल ह्याचाच ध्यास घेऊन ध्यानमय स्थितीने आजचा हा दिन पार करुया !

You cannot copy content of this page