Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा …

ब्रह्मर्षी पद काय आहे याची सेवेकऱ्यांनो तुम्हाला कल्पना नाही. साक्षात त्रिगुण देखील त्यांच्यापुढे वाकतात असे ते पद आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश अन …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे, “मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात, ”बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

सद्गुरु येथे आहेत तोपर्यंत साधा, साधून घ्या ©️

सद्गुरु येथे आहेत तोपर्यंत साधा, साधून घ्या ©️

श्री समर्थ मालिक – सेवेकरी कसाही असो, सद्गुरु जितके कठीण, तितकेच ते लोण्यापेक्षाही मऊ आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे सेवेकरी वाटचाल करू लागला तर ते कधीही कठीण होणार नाहीत. सेवेकऱ्यांचे, सर्वस्वांचे निधान या ठिकाणी आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी सावधगिरीने वागावे. तुम्ही नामात दंग राहिलात, मग कुठेही जा, ते तुमच्या पाठीशी आहेत.

सद्गुरुंचा आदेश, प्रणव तीन ताळ, सप्त पाताळ, २१ स्वर्ग घुमत असतो.

अघोरांनी किती जरी थैमान घातले, तरी अंती विजय सताचाच आहे. आता जे चालले आहे, ते असेच आहे.

काही सेवेकर्‍यांनी किती कर्तव्य बजावले आहे? तर शून्य ! कर्तव्याची वाटचाल थोडी पण बडबड जास्त असते. म्हणून सेवेकऱ्यांनी जर शंका आणल्या तर त्या सद्गुरूंना माहीत असतात. तो जे काही करतो ते सर्व सद्गुरु जाणतात. थोडासा त्रास सहन केला पाहिजे. म्हणून त्या संतांनी असे म्हटले आहे.

पूर्वीच्या संताप्रमाणे कृती करा अन् चौकटीत बसा. राम अवतारात, कृष्ण अवतारात कर्तव्य झाले. सद्गुरु आदेश, संदेश पाळा. जोपर्यंत स्थूलांगी सद्गुरु येथे आहेत तोपर्यंत साधा, साधून घ्या. याची खूणगाठ बांधा. एकदा का फिरतीवर गेले की तुम्ही या म्हटले तरी येणार नाहीत. उद्या ते फिरतीवर गेल्यावर मग दरबारच दरबार ! कित्येक वेळेला संदेश दिले की, अघोरां बरोबर सतालाही त्रास होईल, म्हणून अघोरी अघोराने खेळ खेळते. सत् सताने खेळ खेळते. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page