Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

पंढरीत विठ्ठल आहेत कां? ©️

पंढरीत विठ्ठल आहेत कां? ©️

श्री विठ्ठल – आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे. मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन केले आहे. आदेश देणारे, कार्य करून घेणारे कोणीतरी वेगळे आहेत. भगवंत आहेत अशी ती खुण दाखविणारे आकारी तत्त्व वेगळे असले पाहिजेत, मग मी आकारी आहे का?

एकादशी या महान महत्वाच्या दिवसाचा अर्थ काय?

प्रथम सेवेकर्‍यांने सत बनण्याचा प्रयत्न करणे. पूर्व संचिताप्रमाणे मानवाने, सेवेकऱ्याने सत् बनण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरु तत्त्व कोण आहे? ज्या आकाराला (सद्गुरुंना) आपण शरण आहात, ते जे तत्व बहाल करतात, चुकलेली जागा दाखवतात, त्यांच्या ठिकाणी रममाण होणे. दहा इंद्रियांचा संगम करून एकाग्र करणे व अकराव्यात लय करणे. निमग्न करणे. मग आपले जे सद्गुरु आहेत ते प्रकाश देऊन आपल्याला आपल्या सुक्ष्माची गती देतात, दाखवितात त्याच्या अनुसंधनाने वाटचाल करणे. दहा इंद्रिये एकत्र करून अकराव्या लय केल्यानंतर मग कशाचीही आठवण रहात नाही. यालाच एकादशी म्हणतात. दहा इंद्रिये एकत्र करून अकरावे जे मन त्या ठिकाणी लय करणे येणे नाम एकादशी !

पण ती दहा इंद्रिये अकराव्यात निमग्न करणारे कोण? तर सद्गुरु ! पण ते इंद्रिये निमग्न कसे करतील? लांड्यालबाड्या करून लवकर निमग्न करतील का? मग असेही सेवेकरी या ठिकाणी आहेत ना? येथील सेवेकऱ्यांची दश इंद्रिये अकराव्यात मिलन झाली आहेत कां? स्वतःचे स्वरूप आपण किंचित पाहिले असाल पण संपूर्ण पाहिले आहे का? ज्या वेळेला दहा इंद्रिये एकत्र करून अकराव्यात तल्लीन झालात, स्वस्वरूप प्रगट झाले त्याच स्वरूपाच्या ठिकाणी पूर्णत्वाने निमग्न झाल्यानंतर त्यालाच समाधी म्हणतात. अशी गती मिळाल्यानंतर “देव पहावयासी गेलो | देव होवोनची ठेलो ||” अशी गती मिळते. मग सांगा पंढरीत विठ्ठल आहेत का कुठे आहेत? ©️

You cannot copy content of this page