Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

भक्त भक्तीतच रममाण झाला पाहिजे ©️

भक्त भक्तीतच रममाण झाला पाहिजे ©️

श्री विठ्ठल – दृष्य आणि अदृष्य हे एकमेकांवर अवलंबून असते. बोलता आणि बोलविता यात अंतर आहे. एकच ते बोलते अन् बोलवून घेते. लिनता, नम्रता आणि शांती हा त्रिवेणी संगम कोणत्याही तत्वाजवळ असलाच पाहिजे. ज्याच्या अंगी हा त्रिवेणी संगम नाही, तो सत् तत्वा जवळ जाऊ शकत नाही. पण जातो. केव्हा अन् कधी? जे सत् तत्व आहे ते भक्ताला कधी सानिध्यात घेतील ते त्यांच्यावर अवलंबून आहे. 

मीच सर्वस्वाचे निधान आहे असे नाही. एकमेक एकमेकावर अवलंबून आहेत. आपण प्रत्यक्ष आहात. मी अदृष्य आहे. प्रत्यक्ष स्थूल देही व्यवहार या ठिकाणी आहे. लाखावर यात्रा जरी भरली तरी मला कोणी पाहिले नाही. पाहणारे भक्त गेले. आता या काळात कोणीही नाही. हौसे, नवसे, गवसे हे त्या ठिकाणी गेले आहेत. सत् भक्त म्हणून नाहीत. आपल्या आदेशा प्रमाणे त्या ठिकाणचे परिवर्तन चालले आहे. 

मालिक कोणास म्हणावे, हे सुद्धा मला कळेनासे झाले आहे. आत्ताचा काळ तसा नाही. भाविक भक्त म्हणावे तर ती ज्योत भक्तीतच रममाण झाली पाहिजे. भक्तीत रममाण झाली तर एवढ्या लांब माझ्यापर्यंत येण्याची आवश्यकता काय? सेवेकरी देऊन देऊन काय देणार आहे मला? कोणत्या गोष्टीची कमतरता आहे का? कोणीही भक्त बिलकुल मागणी न करता परतला आहे का? मग हे भक्त आहेत असे म्हणता येईल का? जे मागायचे ते मागत नाहीत. म्हणून मला त्यांना लवकर दर्शन द्यावे असे वाटत नाही. एकही भक्त सत् भक्तीत रममाण नाही. जर रममाण झाला असता तर मला गाठ घेण्याची आवश्यकता वाटली असती.©️

You cannot copy content of this page