Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

दिलेली तिजोरी भरपूर झाली की …©️

दिलेली तिजोरी भरपूर झाली की …©️

श्री समर्थ मालिक – येथून पुढे काय होईल हे सांगता येत नाही. उ:शापाचा काळ संपत आला आहे. आणखीन काही दिवस त्रास होईल, पण सेवेकर्‍यांनी बिलकुल घाबरू नये. तिजोरी (नाम) दिली आहे. तिची जोपासना करणे.

हल्ली ठिक ठिकाणी अनुभव मिळत आहे की संकटाच्या वेळीच मानवांना माझी (भगवंताची) आठवण होत असते. सुखी असले म्हणजे हजार दैवते पुजतात. पण अखेरीस (वेळप्रसंगी) माझी आठवण होते. तो आठवण करतो.

इथून पुढे फारच दिवस कठीण आहेत. ते पहाल, सांगू शकाल. मात्र जे कर्तव्य आहे ते चालूच राहील. यात न्यूनता होणार नाही. सेवेकऱ्यांनी चिंता करावयाची नाही. त्यांनी नामस्मरणात राहावे. मात्र दिलेली तिजोरी (नाम) चोख ठेवण्याचा प्रयत्न करणे. मी एकाच नामातीत आहे. यातील अर्थ आपण ओळखावा.

आरतीचे वेळेला सर्व सेवेकरी ललकारी म्हणतात, तिचा अर्थ सेवेकऱ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कळेल.

ॐ कार बीज मात्रेन नित्यं ध्यायंती योगिन: | कामदम् मोक्षदम् चैव ॐ काराय नमो नमः || हा योगी कोण याची ओळख करून, स्वतःची दृष्टी हि तेजोमय करून योग्याला पाहण्याचा प्रयत्न करा. तो योगी कुठे आहे, हे सेवेकर्‍यांनी विसरता उपयोगाचे नाही.

सर्वस्व सांगितले तरी, सेवेकऱ्यांच्या लक्षात राहील कि नाही कोण जाणे? पण मायावी स्थिती लवकर ध्यानात राहते, म्हणून होते ते चांगल्यासाठीच होते. काही सेवेकरी आपल्या कर्तव्यात तल्लीन होते. तत्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. सेवेकऱ्याला पाहता आले नाहीत तरी क्षमा आहे. सेवेकऱ्याने एकाच तत्वाने आपल्या प्रकृतीचा उजाळा करणे हे संदेश आहेत. दिलेली तिजोरी भरपूर झाली की प्रकृतीचा उजाळा लवकर होतो. ©️

You cannot copy content of this page