Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

अंगी दुजा भाव ठेवू नका…©️

अंगी दुजा भाव ठेवू नका…©️

श्री समर्थ मालिक – दिव्याचे अंगी नाही दुजा भाव | चोर आणि साव सारखाची || तेव्हा कोणाची कृपा आहे? कोणाची तरी कृपा आहे असे आपणास वाटत असेल तर निवेदन करावयास नको कां? काही चोर पण आहेत, काही साव पण आहेत. काहींनी चोरी केली तर मला त्याची जाण आहे. मी कणाकणात भरलेलो‌ आहे. चोरांना केव्हाही सोडणार नाही. ते नजरेतून सुटणार नाहीत. काहींनी हे प्रत्यक्षात अनुभवले देखील आहे. ज्यांनी अनुभवले नाही त्याना ते माहीत होईल.

दिवा म्हणजे कोण? दिवा हा दीनदयाळ आहे. ज्याला तुम्ही शरण गेलात, त्यांनी तुम्हाला प्रकाश दिला आहे. प्रकाश तुम्ही स्वतः घेऊन आलेले नाहीत. तोच दिन, तोच दिवा प्रत्यक्ष घडण घडते ती पाहत आहे. असे असताना सेवेकर्‍यांना वाटते मी कोणीतरी विशेष आहे, पण या ठिकाणी जे घडते ते कोणीतरी पाहते हे लक्षात ठेवा.

सेवेकरी बोलून जातो, घडण घडते. कोणीतरी घडवून घेत असते. त्यांचे कर्तव्य ते घडवून घेत आहेत. सेवेकरी हा नामा निराळा आहे. काही सेवेकरी प्रकाशमान आहेत. सानिध्यात गती घेत आहेत. गती घेत असताना, आसनाधिस्त अन माझे बोलणे चालत असताना मीच शहाणा म्हणून त्यांची मान डोलत असते. असे झाले आहे, तेच सांगत आहे. ही घडण मीच घडवून घेतो. ओळखले तर अनेकात तत्व एकच आहे ह्याची जाण मिळेल. त्याही सेवेकऱ्यात मीच आहे अन् दुसऱ्यातही मीच आहे असे जर वाटत असते तर त्यांने तसे केले नसते.©️

You cannot copy content of this page