Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री स्वयंभू महेश – ज्या वेळेला देव दानवांचा वाद निर्माण झाला, त्यावेळेला समुद्रमंथन करण्याचे ठरवले. ते मंथन केल्यानंतर त्यातून १४ रत्ने निघाली. …

संवाद तुकारामांशी…©️

संवाद तुकारामांशी…©️

श्री संत तुकाराम महाराज ()

सद्गुरु बाबा : चैतन्यात लय झाल्यानंतर दर्शनाची अपेक्षा असते का? (चैतन्यात लय येणे स्थिती – स्थूल, सुक्ष्म, कारण, महाकारण अशा स्थितीने भक्ताला भगवंत आपल्यात सामावून घेतात ती स्थिती)

संत तुकाराम : चैतन्यात मी लय कसा, तर (आपल्याच) ध्यानात असतो. (येथे तुकाराम महाराज हि स्थिती स्पष्ट करताना म्हणतात, जरी मी चैतन्यात लय असलो, तरी सुद्धा मी सताच्या ध्यानात, नामस्मरणात असतो), पण त्या ध्यानातून जाग आल्यानंतर आपले दर्शन मिळावे हि इच्छा असते. पुढे ते म्हणतात, “परंतु सता येथेच दर्शन होते. परंतु प्रत्येक सेवेकर्‍याची इच्छा असते कि प्रत्यक्ष दर्शन घडावे. तेव्हा वर्षातून एकदा तरी सेवेकर्‍याला दर्शन मिळावे.

संत तुकाराम पुढे म्हणतात, सता! पांडुरंग अन आपण वेगळे आहात का? आम्ही आपणाजवळ काय निवेदन करावे?

सद्गुरु बाबा : त्यांनी आपणास चैतन्यातून याचसाठी पाठविले, मग ते कसे काय असतात, काय सांगायचे ते सांगा.

सद्गुरु बाबा : विठ्ठलाची श्रेष्ठता मोठी आहे. आम्ही पण सेवेकरी आहोत. (येथे श्री सद्गुरू माऊलींची लिनता आणि नम्रता दिसून येते.)

संत तुकाराम : आम्ही आपले सेवेकरी, आम्हास तर माहित नाही. आम्ही सर्वस्व एकच समजतो. आपल्या सानिध्यात आल्यानंतर नाराज का होणार आहे?

सद्गुरु बाबा: आपले परम दैवत विठ्ठल! टक लावून पहात आहेत की आमच्या तुकारामांना काय विचारतात?

संत तुकाराम : ते आम्ही काय सांगू? पण त्यांनी सांगितले आहे ते सर्वस्व येथेच आहे. (येथे तुकाराम महाराजांनी गुह्य उघड केले आहे.)

सद्गुरु बाबा : त्यांनी सांगितले की येथेच पकडा.

संत तुकाराम : ते काही असो. आम्ही सताचे सेवेकरी. जसे सांगितले तसे आम्ही वागू सता ! हे कोणते युग चालू आहे?

सद्गुरु बाबा : हे कलियुग चालू आहे.

संत तुकाराम : आपणास कल्पना आहे, आम्ही सेवेकरी काय सांगू शकणार? एकच सांगावेसे वाटते, योग आला म्हणून. या कलियुगातील मानव आहेत. त्यांना कशाची भक्ती करावीशी वाटते सता ! आपल्या सानिध्यात असणाऱ्या म्हणजे सत सेवेकरी! सत सेवेकर्‍यांनी कशाची उपासना करावी? तर केवळ सताची! परंतु सत पहावयाचे असेल तर वागणे कसे पाहिजे, बोलणे, राहणे कसे पाहिजे? तर सत शुद्ध! मग सेवेकरी सतापासून दूर का आहे?

सता आपणास कल्पना आहे, तरी थोडेसे सांगतो, ज्यावेळी कर्तव्यासाठी आम्ही येथे आलो, त्यावेळी अघोर मानवांनी किती त्रास दिला? परंतु सता आम्ही त्यांना वेडेवाकडे बोललो का? त्याचप्रमाणे या कलियुगातील मानव वागू लागले तर? ते सता पासून दूर राहतील का?

तुकाराम महाराज म्हणतात, “एकच, आपल्या दर्शनाची इच्छा आहे.” ©️

You cannot copy content of this page