श्री विठ्ठल – सद्गुरु तत्त्व भक्ताला प्रकाशित करतात, पण त्याला मूळ सापडले नाही, तर तो काय सांगणार? म्हणून गुरुचरणाच्या महतीचे वर्णन करणे याचा मला सुद्धा अंत सापडला नाही, म्हणून थोडक्यातच मी वर्णन केले आहे. गुरुचरण हे फार श्रेष्ठ अन पवित्र आहेत. त्याशिवाय मार्ग नाही, गती नाही. त्याच्याशिवाय संरक्षक, तारक कोणीही नाही. हे वर्णनाच्या पलीकडे आहे.
सद्गुरू समर्थ हे सर्व ठिकाणी सम आहेत.
सद्गुरू चरणांचे वर्णन करणारा मी तरी कोण आहे? मग गुरुचरण कोठे सापडतील? आकाशात, पाताळात सापडतील का कुठे मिळतील हे ज्याचे त्याने ओळखावे. त्रिगुणांचा कारभार हाकणारे तत्त्व, त्यांना पण चरणांचा अंत सापडला नाही. फक्त एका तत्त्वाने मात्र चरणांचा अंत लावला ते विष्णू तत्व होय. त्यांनीच अंत लावला. यावर विचार करणे. गुरुचरण हे सर्व तीर्थाची खाण आहे, सर्व तीर्थांचे माहेरघर आहे, म्हणून सद्गुरु हे श्रेष्ठ आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या. दुसरा म्हणतो म्हणून म्हणू नका. गुरुचरण हे ज्याने अनुभवले, तोच त्याचे वर्णन करू शकतो. (समाप्त) ©️
