Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

स्मृतिगंध – वालावल आश्रम ©️

स्मृतिगंध – वालावल आश्रम ©️

Oplus_16908288

अतिसुंदर, मनभावन, विलोभनीय, चितचोर असे हे कोकणातील आपल्या वालावल आश्रमाचे छायाचित्र टिपलेले आहे ते आपल्या गुरुबंधू श्री सर्वेश प्रदीप गावंडे यांनी….

निसर्ग सौंदर्याने नटलेले, एक वैशिष्ट्यपूर्ण असा निराळा बाज घेऊनच साऱ्या पंचक्रोशीत उभे असलेले हे आपले स्थान कांही वेगळेच आहे हे सर्वजण मान्य करतातच आणि तशी प्रतिक्रियाही ते प्रगट करतात. ह्या स्थानाचे म्हणजेच आपल्या श्री सद्गुरू माऊलींच्या आश्रमाचे वैशिष्ट्यही आपणा सर्वांना विदीत आहे, ते म्हणजे हा पूर्वाश्रमीचा (राम अवतारातील) परम पूजनीय पितामह वशिष्ठ गुरुदेवांचा आश्रम होता. येथेच उत्तरेतून श्री राम प्रभूंना विद्याभ्यासासाठी श्री गुरुदेव पितामह घेऊन आले होते आणि सीताहरणाच्या प्रसंगांतून सीतामाईंची सुटका करून परत स्वगृही परतताना श्री रामप्रभूंनी पुन्हा एकदा येथे येऊन व आपले पदस्पर्श सोडून पितामहांच्या आश्रमात पदार्पण करुन या भूमीला परम पवित्र बनविले होते.

तर असा हा वैशिष्ट्यपूर्ण आश्रम छायाचित्र रुपाने प्रतिबिंबित करुन समस्तांच्या स्मृति जागृत केल्याबद्दल धन्यवाद !

You cannot copy content of this page