Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

श्री गुरु पौर्णिमा ©️

श्री गुरु पौर्णिमा ©️

अलक एकचित्त – सेवेकरी अन् सद्गुरु हे नाते निराळे आहे. सेवेकरी वेगळा नाही. म्हणून सेवेकऱ्यांनो, बंधुभाव, प्रेम निर्माण झाले पाहिजे. सद्गुरूंनी दिलेला उपदेश ध्यानी बाळगून आचरणात आणणे, ठेवणे.

समता म्हणजे सेवेकरी सद्गुरुंशी तादात्म्य होणे. ही समता सेवेकऱ्यात पाहिजे, बंधुभाव पाहिजे. (एकाच माता पित्याची मुले जशी वागतात तसे वागा) कोणत्याही तऱ्हेचे किल्मिष मनामध्ये असता कामा नये. एक सेवेकरी एक सद्गुरु एवढे तादात्म्य व्हावयास पाहिजे.

आजची ही सेवा तन-मन-धनाने, स्वयं भावनेने अर्पण करावयाची. हाच गुरुकुलाचा महिमा आहे. सेवेकऱ्यांची पूजा म्हणजेच सद्गुरूंची पूजा! सद्गुरु निराळे नाहीत. ते तादात्म्य झालेले असतात. ते कधीही कोणाला सुटणार नाही.

जी ज्ञानरूपी गंगा पाजली तिचे थोडे तरी चीज व्हावे. त्याचे श्रेष्ठत्व म्हणून व्यासपूजा. यावेळी सद्गुरु अन सेवेकरी एकमय होतात. सेवेकऱ्याप्रमाणे सद्गुरु ही तादात्म्य होतात. गुरु आपल्या शिष्याला ज्ञान देतो, एकरूप होतो. त्याची आठवण करून देणे. हाच गुरुपौर्णिमेचा महिमा आहे. या शुभ दिनापासून बंधूमय भावनेने, प्रेममय भावनेने वागणे हेच शुभ दिनी संदेश देत आहे. ©️

You cannot copy content of this page