Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

प्रबोधिनी ©️

प्रबोधिनी ©️

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या तऱ्हेचा आहे. चमत्कार नमस्काराला भाळणारे मानव जास्त आहेत. 

सद्गुरु तत्व काय आहे, याची त्यांना माहिती नाही. ते समजतात, सद्गुरु हे मानव आहेत. अन् परमेश्वर तत्त्व वेगळे आहे. अशी त्यांची भावना आहे म्हणून अवधी लागतो. 

काही नव्यानं येणाऱ्या ज्योती आहेत. त्या ओघाने येणारच आहेत. येथील सेवेकऱ्यांना सद्गुरु तत्व पटले असेल तरी आपली श्रद्धा ढळू द्यावयाची नाही. माया सेवेकऱ्यांचा कस घेते आहे. पण ती घेऊन घेऊन तरी किती कस घेणार? सेवेकऱ्यांनो, तुम्ही कोणीही नाहीत. एकच आत्मज्योत तुमच्या स्वरूपात फेकली आहे. म्हणून तुमच्यावर मोठा पडदा टाकून तुमच्याकडून हे करून घेत आहे. फक्त एकच ध्यानात ठेवणे, तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page