Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

महाशिवरात्र ३ ©️

महाशिवरात्र ३ ©️

श्री स्वयंभू महेश – हल्लीचा मानव अतिशय अहंकारी झाला आहे. त्याला गुरुपद कळलेले नाही. गुरुपद म्हणजे आकार आला. मानवाला त्यांची (गुरुपदाची) सेवा करायला त्रासदायक होते, मग त्याला सद्गुरू चरण कसे सापडणार? ज्याला काही कळत नाही, तो उघड्या धोंड्याला शेंदूर थापून त्याला आकारात आणतो. त्याच्या पाया पडतो, पण त्याला बोलता येत नाही अशा गोल आकारी दगडाच्या पाया पडणारा मानव, त्याला बोलत्या चालत्याचे दर्शन घ्यावयास लाज वाटते. असेच मानव आज पहात आहोत. काय चालले आहे हे कळते आहे, पण मानव फसतो आहे, त्याच्याकडून वळत नाही.

मानवानेच आकार आणि मूर्ती बनवली, तिची स्थापना केली, पण त्याची व्यवस्था नसेल तर कुत्रा त्या ठिकाणी नीच कृत्य करतो. त्याच्याच मानव पाया पडतो आणि ईश्वर तत्व कुठे आहे हे त्याला कळत नाही. कुत्र्याने जरी नीच कर्म केले तरी त्यात सत् आहे. पण पाहणाऱ्यालाच दिसेल. पण दगड अन् कुत्रा सारखाच का? पण जो पाहिल, त्यालाच ते कळेल. म्हणून मानव श्रेष्ठ आहे. 

भगवंताने आकार मानव रूपातच घेतला आहे. काही कुर्म, वराह सुद्धा अवतार झाले आहेत. पण मानवात अवतार घेऊन त्याने जागे केले तरी तो निद्रिस्त आहे. हे फक्त प्रकृतीचे चाळे आहेत. प्रकृती अंगाने सेवेकर्‍यांनी जाऊ नये. ही माझी विनंती आहे. प्रकृती भिन्न आहे म्हणून सांगत आहे. 

भिन्न भिन्न प्रकृती | कर्मभेदे दिसती आकृती  || (समाप्त)

You cannot copy content of this page