Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

महाशिवरात्र ©️

महाशिवरात्र ©️

श्री कैलासपती स्वयंभू – मी हिमालय पर्वतावर जो बसलो आहे, तो आदेशाप्रमाणेच बसलेलो आहे. या ठिकाणी, आदेश मिळाल्यानंतर यावे लागते, मग आदेश पाळणे, मानणे सेवेकऱ्याचे कर्तव्य नाही का?

जरी माझे नाव स्वयंभू असले, तरी या स्वयंभूला निर्माण करणारा कोणीतरी वेगळा स्वयंभू आहे, म्हणून, मी एक त्यांचा सेवेकरी आहे असे माझे म्हणणे आहे.

महा म्हणजे काय? तर मोठा. मोठा म्हणजे केवढा? म्हणजे वर्णनाच्या पलीकडे, पाहण्याच्याही पलीकडे, जो आहे तोच महा आहे.

महाशिवरात्र – हा शिव कोण? अन् त्याची रात्र कोणती? महा म्हणजे वर्णनाच्या पलीकडे, म्हणून महा म्हटले आहे. शिव म्हणजे जे आहे ते स्वयमेव तत्व ! त्याला कोणी घडविले नाही. आकार दिला नाही. पहावयास गेले तर सापडत नाही. असा जो शिव, त्याच्या ध्यानात सेवेकरी तल्लीन झाला म्हणजे मग रात्र काय आणि दिवस काय हे ध्यानात येत नाही. हिच ती शिवरात्र ! असे जे तत्व तेच सत्! ©️

You cannot copy content of this page