गुरुबंधूंचे नाते कोवळे का? गुलाबाचे फुल कोवळे नाजूक असते. तसे सेवेकर्यांनी आपले मन का ठेवू नये? सताला अतिशय त्रास झाला, सतावर असताने कुरघोडी केली म्हणजे अवतार कार्य घ्यावे लागते. तद्वतच आता काय चालले आहे, काय होत आहे याचा अनुभव सेवेकऱ्यांना मिळाला की नाही? म्हणून हे समजून आपण आपल्या कर्तव्यात (नामस्मरणात) निमग्न का होऊ नये? सेवेकर्यांना विचारणा केली, उत्तम आहे. हे मान्य आहे.
अघोरांचे खच्चीकरण कसे होते याची कल्पना सेवेकऱ्यांना नाही. त्यांच्या दुष्कृत्यांची भरपाई झाल्यानंतर त्यांची कृती त्यांच्यावरच उलट झाल्यानंतर कार्य संपले. जो अघोर मानव गुळाने मरतो, त्याला विष पाजण्याची आवश्यकता काय? एवढेच कि थोडा अवधी लागतो. सत् भक्ताला थोडे कष्ट झाले तरी चालेल. अघोराचे थैमान जिथपर्यंत चालायचे तिथपर्यंत चालू द्या. हे थैमान तात्पुरते असते. शेवटपर्यंत नाही. अनेक वेळेला सांगितले की अघोर हे सर्वस्व खतम करता येत नाही पण खतम होणार हे सत्य आहे. सत् असत हे दोन्ही असल्याशिवाय घर्षण होत नाही. वृक्षाला अनेक फांद्या असतात, पण त्या फांद्यांची एकमेकाला ओळख नसल्यामुळे त्यांचे घर्षण होत असते. पण बुंध्याने कधी म्हटले आहे का? हेच सेवेकऱ्याने लक्षात ठेवणे. म्हणून फांद्या फांद्यांचे जरी घर्षण झाले, नाना व्याप जरी झाले, तरी जो बुंधा आहे, तो मुळासकट उपटून पडत नाही. म्हणून बुंधा निर्माण करणारी शक्ती, हे सर्वस्व पहात आहे. काय होत आहे काय नाही यावर लक्ष आहे. इतकेच काय, याचा आपणास अनुभव मिळेल. काळ अगदी नजीक आला आहे. सताचे कर्तव्य धीर गंभीर आणि शांत असते. त्या बुंध्याला मुळासकट उपटण्याचे सामर्थ्य त्या तत्वात असते. बुंध्याला नसते. या चालू वर्षात पुढे काय होते ते पहा. पहावयास मिळेल. धीर सोडू नका. ©️
