Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

शुद्ध व्हा ! शुद्ध गतीने जा ! मनाची शुद्धता ठेवा ! ©️

शुद्ध व्हा ! शुद्ध गतीने जा ! मनाची शुद्धता ठेवा ! ©️

श्री समर्थ मालिक – या आसनाच्या सेवेकऱ्यांना अनेक वेळेला टोचणी दिलेली आहे. सर्व सेवेकऱ्यांची मनोभावना शुद्ध आहे का असे देखील विचारले.

आसनाधिस्त गावाला जाऊन किती दिवस झाले? आदीअंता पासून ते आहेत.

काही गुप्त गोष्टी गुप्त असतात. सत् त्या गोष्टी गुप्त ठेवतात.

अर्जुनाला देखील सांगितले होते, “सत् असताचा वाद विवाद चाललेला आहे. याच्यासाठी कोणत्याही सेवेकऱ्यांनी, “बस, गती घे !” मला सांगा, असे विचारणे योग्य आहे का? जरी सेवेकर्‍याला सांगितले, तरी सांगून काय उपयोग आहे?

अजून शुद्ध व्हा ! शुद्ध गतीने जा ! मनाची शुद्धता ठेवा ! “बस, गती घे आणि काय आहे ते सांग” हे म्हणने योग्य आहे का?

भक्ती जितकी साधी, तितकीच कठीण आहे. म्हणून सोप्या सुलभ मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. साधी सोपी भक्ती म्हणजे सरळ शुद्ध मार्गाने गेला तर कठीण आहे नाही का? ©️

You cannot copy content of this page