Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

दृश्य आहे तेच अदृश्य कर्तव्य करीत आहे…©️

दृश्य आहे तेच अदृश्य कर्तव्य करीत आहे…©️

आम्ही मानव आहोत. कर्तव्य करीत आहोत. पण प्रत्यक्षात या दरबार मध्ये असणाऱ्या सेवेकऱ्यांच्या महान महान चुका होत आहेत. पण कुणाला फेकले आहे काय? टाकले आहे काय?

अखंड तत्व अखंड आहे. दृश्य आहे तेच अदृश्य कर्तव्य करीत आहे. सेवेकरी म्हणतो, मी कर्तव्य करीत आहे, पण या मानवाची कृती केव्हा ना केव्हा तरी बाहेर पडणार आहे. आपल्या कर्तव्यात राहणे. दयाघन माऊली आहे. तुम्ही मानव काय करू शकता? काळ समिप आलेला आहे. सेवेकर्‍यांनी कर्तव्यात राहणे. त्राही त्राही होण्याची वेळ आलेली आहे. हे संदेश सेवेकर्‍यांना आहेत. लपवाछपवी, दडवा दडवी करू नये. ते तुमचे जर आहे, जे सर्वस्व तुम्ही टाकले आहे, तर का निवेदन देऊ नये? कुठली ज्योत जर चुकली असेल तर निवेदन का देऊ नये? सेवेकर्‍याच्या मस्तकावर हात टाकल्यानंतर सेवेकरी कुठे गेला होता?

जप तप करावयास सद्गुरु ध्यान, सद्गुरु नाम यापरते अधिक काही नाही असे का सांगितले आहे? हेच ते ज्ञान ! त्यांच्या कृतीप्रमाणे घडत आहे. घडून गेले आहे. ते आता दिसत आहे. नाराजी कोणी पत्करायची नाही. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page