Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

परम निधान एकच सत् आहे…!©️

परम निधान एकच सत् आहे…!©️

श्री विठ्ठल – सर्व ठिकाणी व्यापक असणारे तत्व, त्याचा अंत नाही. आम्हा सारख्यांना काही अधिकार बहाल करून कर्तव्यासाठी पाठविले आहे अन् त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्य प्रवीण असतो.

सत् हे सामान्य तत्व नाही. सहज बोलतील. सहज बोलणे हाची उपदेश, पण घेईल त्याला. मग त्याला काही एक कमी पडणार नाही. न घेईल तो रिकामा घडाच समजा.

विठ्ठल हे एक आकारी तत्त्व आहे. आदेशाप्रमाणे त्यांनी फेकलेले आहे. ते कशासाठी? मानवांना भक्तीचे वळण लागावे, त्यांनी सत मार्गाने जावे याच हेतूने आम्हाला येथे पाठविले आहे.

सत् भक्तांची अतिशय तळमळ असते, त्यांना कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने दर्शन द्यावे लागते. भक्तांना बोल गेले, ती वेळ निघून गेली आहे. म्हणून परम निधान एकच सत् आहे. या पलीकडे दुसरे कोणीही नाही. मात्र जो पारखी आहे, त्यालाच हे कळेल. इतरांना काही कळणार नाही. मग अखंड शक्तीची, महान शक्तीची ओळख करून देणारे व चुकलेली ठेव दाखविण्यासाठी कोणीतरी आकारी असावा लागतो. मग दैवत श्रेष्ठ का चुकलेली जागा दाखविणारे श्रेष्ठ? ©️

You cannot copy content of this page