Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

आकाराला सोडून तत्त्व नाही…©️

आकाराला सोडून तत्त्व नाही…©️

श्री समर्थ मालिक – सगुण निर्गुण आहे कसे अन् नाही कसे?

जड आहे. स्थूल देह म्हणजे त्याला मानव म्हटले आहे. प्रकृती स्वयं आहे का? तर नाही. मी सगुण आहे, निर्गुण पण आहे. पण कोणाला? जो जाणेल त्याला. त्याला सांगण्याची आवश्यकता नाही.

आपल्या नादात गुंग असते ते कोण? जोपर्यंत भिन्नत्व नाही, तोपर्यंतच एकरूप असते, पण मायेची हवा लागल्यानंतरच विसर पडतो. विसर पडल्यानंतर सत् आणि प्रकृती भिन्न होते अन् मग वाटते मी कोणीतरी विशेष आहे. मी अमक्या तमक्याचा आहे. पण ईश्वराचे नाव सांगतो का?

त्याचे सुकृत असेल तरच तो सत् सानिध्यात येतो. मग त्याला वळण लागते.

प्रथम तत्व आणि प्रकृती एकरूप झालेली असते, पण वयात आल्यानंतर एकरूप होणे कठीण होते. मी सगुण आहे अन् निर्गुण पण आहे. प्रकृती ठायीच लय केल्यानंतर मग मी निर्गुण आहे की नाही? ही शक्ती मिळविण्यासाठी काही वर्षे लोटावी लागतील. सर्व ठिकाणी मी आहे अन् म्हणून आकाराला सोडून तत्त्व नाही. (समाप्त)

You cannot copy content of this page