Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

आकार पूर्ण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय …©️

आकार पूर्ण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय …©️

आकार पूर्ण ॐ कार स्वरूप बनल्याशिवाय अधिकार वाणी निर्माण होणार नाही. अन् ती निर्माण झाल्यानंतरच गती मिळते कि मी कोणाला शरण आहे. ते तत्व कोण आहे? ही सर्वस्व गती मिळते ती कशी? “प्रत्यक्ष आकाराला स्थूल देही दर्शन मिळते. पण केव्हा आणि कधी? जोपर्यंत ज्ञान दृष्टीने पाहता येत नाही, मग प्राकृत दृष्टीने काय पाहणार? म्हणून प्रत्यक्षात पाहणे अन् अप्रत्यक्षात पाहणे या दोन शाखा आहेत.

सूर्य किती अंतरावर आहे, हे वर पाहिल्यानंतर सूर्य पहावयास मिळतो. म्हणून तो हाताला आला आहे कां? पाण्याच्या भांड्यात सुद्धा प्रतिबिंब दिसते.‌ पाण्यात प्रतिबिंब दिसले म्हणून ते हाताला आले आहे काय? म्हणजे पाहण्याच्या दृष्टी दोन आहेत. पण हे सर्व मायेचे खेळ आहेत. मन जर शुद्ध स्फटिका सारखे सद्गुरु चरणांजवळ ठेवले, मग कसेही पहा, काही वेगळे दिसणार नाही. पण असे होणे कठीण आहे.

मनाचे हेलकावे खात खात सद्गुरु चरणांजवळ निमग्न होणे सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. मन कुठूनही आले नाही. मन हे माझ्यापासून आहे असे म्हटले आहे. मन म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण केलेले आहे. मनाचे आणि तत्त्वाचे बोलणे चालणे ओळखा. म्हणून सेवेकऱ्याने अशा तऱ्हेने वाटचाल करणे. मनाने जरी कोलांट्या उड्या घेतल्या, तरी देह सद्गुरु चरणांजवळ घालणे. (समाप्त)

You cannot copy content of this page