Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

अनुग्रह देणारे वेगळ्या प्रकारचे…©️

अनुग्रह देणारे वेगळ्या प्रकारचे…©️

श्री समर्थ मालिक – भक्त हा भगवंतावर अन् भगवंत हे भक्तावर अवलंबून असतात. भक्ती प्रेम निर्माण झाले की मनाची चंचलता आपोआप दूर होते. जोपर्यंत मनाची शुद्धता नाही, तोपर्यंत भक्ती ही कठीण वाटते. मन शुद्ध झाले की भक्तीत कठीणता नाही.

सर्वभूतेषु एकच तत्व आहे, पण अनंत रूपे अनंत नामे याने नटलेली महामाया ही नटविली कोणी? तर त्याच महान तत्वाने नटविली आहे. अनंत रूपामध्ये ही प्रकृती वावरते. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, म्हणून प्रकृती ही अनंत स्वरूपाने नटलेली आहे. तशीच मते सुद्धा भिन्न आहेत.

पूर्वजन्मीचे सानिध्य आहे, त्यामुळे त्याला जरी सद्गुरु दर्शन नसले, तरी मनाला सत् बनविण्याचा प्रयत्न केला तर ते स्थिर होते. मन हे कोणापासून आहे? प्रकृतीची अंगे वेगवेगळी दाखविलेली आहेत, पण प्रकृतीच्या आतमध्ये एकच तत्व आहे. मग ते एकच तत्व भिन्न प्रकृतीच्या अनुसंधनाने अनुग्रह देण्याचा प्रयत्न करते. ते ही, त्या तऱ्हेची प्रकृती असेल तर उपरती येते. अनुग्रह देणारे वेगळ्या प्रकारचे अन् गुरु वेगळ्या प्रकारचे असे म्हणता येईल का? ©️

You cannot copy content of this page