Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

दश इंद्रियांचा करा मेळा, अकरावे मन त्यामध्ये घाला…©️

दश इंद्रियांचा करा मेळा, अकरावे मन त्यामध्ये घाला…©️

श्री विठ्ठल – जे मागायचे ते मागत नाहीत, म्हणून मला त्यांना लवकर दर्शन द्यावे असे वाटत नाही. एकही भक्त सत् भक्तीत रममाण नाही, जर रममाण झाला असता तर मला गाठ घेण्याची आवश्यकता वाटली असती. आत्ताच्या परिस्थितीत कोणीही सत् भक्त मला कडकडून भेटला आहे का? आपणाला सर्वस्व माहित आहे.

मला कोणत्यातरी तत्त्वाने त्या ठिकाणी स्थापन केले आहे. आदेश देणारे, कार्य करून घेणारे कोणी तरी आहेत. पण ती खूण दाखविणारे आकारी असले पाहिजेत. मग मी आकारी आहे का? एकादशी या महान महत्वाच्या दिवसाचा अर्थ काय? प्रथम सेवेकर्‍यांने सत बनण्याचा प्रयत्न करणे. पूर्व संचिताप्रमाणे मानवाने, सेवेकऱ्याने सत् बनण्याचा प्रयत्न करावा.

सद्गुरु तत्त्व कोण आहे? ज्या आकाराला आपण शरण आहात, ते जे तत्व बहाल करतात, चुकलेली जागा दाखवितात, त्यांच्या ठिकाणी रममाण होणे, दहा इंद्रियांचा संयम करून एकाग्र करणे व अकराव्यात लय करणे. निमग्न करणे. मग आपले जे सद्गुरु प्रकाश देऊन आपल्या सुक्ष्माची गती देतात, दाखवितात त्याच्या अनुसंधनाने वाटचाल करणे.

दहा इंद्रिये एकत्र करून अकराव्या लय केल्यानंतर मग आठवण नाही. यालाच एकादशी म्हणतात. दहा इंद्रिये एकत्र करून अकरावे जे मन त्या ठिकाणी लय करणे येणे नाम एकादशी ! पण ती दहा इंद्रिये अकराव्यात निमग्न करणारे कोण? तर सद्गुरु ! पण ते इंद्रिये निमग्न कसे करतील? लांड्या लबाड्या करून लवकर निमग्न करतील का? मग असेही सेवेकरी या ठिकाणी आहेत. येथील सेवेकऱ्यांची दश इंद्रिये अकराव्यात मिलन झाली आहेत कां? स्वतःचे स्वरूप आपण किंचित पाहिले असाल पण संपूर्ण पाहिले आहे का? ज्या वेळेला दहा इंद्रिये एकत्र करून अकराव्यात तल्लीन झाला, स्वस्वरूप प्रगट झाले, त्याच स्वरूपाच्या ठिकाणी पूर्णत्वाने निमग्न झाल्यानंतर त्यालाच समाधी म्हणतात. ©️

You cannot copy content of this page