Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – मालिक वैकुंठी नाहीत. योगीयांच्या हृदयी नाहीत, तर मग मी कोठे असतो? तर मी सत् भक्तांच्या ठिकाणी असतो. तेथेच …

जे ठाम, तेच या ठिकाणी येऊ शकतात ©️

जे ठाम, तेच या ठिकाणी येऊ शकतात ©️

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने – सर्वस्व सृष्टीची रचना करणारे आपण, ॐ कार ध्वनी फेकणारे आपण अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे देखील आपण ! पण वाईट वाटते एकच की, सेवेकर्‍यांनी हे घेतले नाही. जर हे घेतले असते तर स्थिती वेगळीच असती. सेवेकर्‍यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना ही संपत्ती त्यांनी का लुटू नये, भंडार का लुटू नये, याची गोडी सेवेकर्‍यांना का असू नये? जर आहे म्हणावी मग लुटण्याची मनाई केली आहे का कोणी? सेवेकरी लुटायला जातात पण तुम्हीच लुटू देत नाहीत. त्यांना ती लुटण्याची तळमळ आहे, पण तुम्ही पोहचू देत नाहीत. पण रहित सेवेकरी झाला की त्या खजिन्याला त्याने हात घातलाच समजा. थोडीशी मनाला शंका आली की, मायेचा पगडा बसतो ! शंका का येते तर मन चंचल होते म्हणून. कारण नटलेले जे आहे ते मायावीने नटलेले आहे अन् म्हणून माया कोणालाही माझ्यापर्यंत येऊ देत नाही. ज्याने तत्वाची ओळख करून घेतली, जे ठाम राहिले तेच या ठिकाणी येऊ शकतात. ही बया आहे. ती म्हणते मीच सर्वस्व ! तिला अधिकार दिलेले आहेत म्हणून सेवेकरी फसतो. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page