Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

माया माझ्यापर्यंत येऊ देत नाही ©️

माया माझ्यापर्यंत येऊ देत नाही ©️

सर्वस्व सृष्टीची रचना करणारे, ॐ कार ध्वनी फेकणारे, अन् सगुणाला पुढे करून कार्य करून घेणारे सत् ! हे सेवेकर्‍यांनी घेतले नाही, जर हे घेतले असते तर?

सेवेकर्‍यांना अनुग्रह मिळाल्यापासून उच्च दर्जाचे बोल मिळत असताना ही संपत्ती त्यांनी का लुटू नये, भंडार का लुटू नये, याची गोडी सेवेकर्‍यांना का असू नये?

आहे म्हणावे तर मग लुटण्याची मनाई केली आहे का कोणी? “पण” रहित सेवेकरी झाला की त्या खजिन्याला त्याने हात घातलाच समजा. थोडीशी मनात शंका आली की, मायेचा पगडा बसलाच म्हणून समजा ! शंका का येते तर मन चंचल होते म्हणून. त्यात सताचा काय दोष?

महामायेला थोडी संधी मिळाली की सेवेकरी गयावया करतो. कारण नटलेले जे आहे ते मायावीने नटलेले आहे अन् म्हणून माया कोणालाही माझ्यापर्यंत येऊ देत नाही. ज्याने तत्वाची ओळख करून घेतली, जे ठाम राहिले तेच या ठिकाणी येऊ शकतात. ही बया आहे. ती म्हणते मीच सर्वस्व ! तिला अधिकार दिलेले आहेत म्हणून सेवेकरी फसतो. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page