Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री एकनाथ महाराज – सद्गुरूंचा महिमा सद्गुरु जाणे. सध्याच्या परिस्थितीत मात्र सद्गुरु महिमा सेवेकर्‍यांना कळणे कठीण आहे. सेवेकरी म्हणजे हा एक त्यांच्या …

श्री समर्थ मालिक – माझ्या पादुका ओळखणाराच ओळखतो. त्या आकाराच्या रूपाने दाखविल्या जातात. नाही पेक्षा मला आकार, विकार, रंग, रुप, आदीअंत, मध्य …

श्री गुरुपौर्णिमा संदेश ©️

श्री गुरुपौर्णिमा संदेश ©️

श्री गुरुपौर्णिमा – आज सेवेकर्‍यांनी साजरा केलेला शुभ दिन सर्वस्व मान्य आहे, रुजू आहे. आजचे संदेश – सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात राहणे. सेवेकरी आपल्या प्रयत्नात असतील, प्रयत्नशील असतील तर हे फार उत्तमात उत्तम आहे.

आजकालचा मानव हा मायावी आहे, शिवाय चोहोबाजूने व्यापलेला आहे. आजच्या या संशयी युगामध्ये मानव हा चारही बाजूने व्यापलेला आहे हे मला पूर्णत्वाने माहीत आहे, म्हणून मला काही बोलता येत नाही. काही सेवेकरी सांगून सुद्धा ऐकत नाहीत. गुरुतत्त्व त्यांना कळलेले नाही. शिवाय टोलवा टोलवी करणे, उडवा उडवी करणे, खोटे बोलणे हे अजून सेवेकऱ्यांचे सुटलेले नाही. तरी अजून त्या सेवेकऱ्यांनी सावध होण्याचा प्रयत्न करावा. आपण कोणाशी लबाडी करतो हे सेवेकर्‍याने ध्यानात घ्यावे. कोणी पाहत नसेल, कोणी ऐकत नसेल, असे जर सेवेकऱ्याचे मत असेल तर ते साफ चुकीचे आहे. हे ज्याचे त्याने ठरवावे. नाहीतर त्याची कृती त्याच्या अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. अन् म्हणूनच अखंड पदाचा सेवेकरी असताना सुद्धा अन् कित्येक वर्षे या शुभ दिनाचा उहापोह करीत असताना, त्याच्या डोक्यात भरत नाही याचा अर्थ काय?

मायातीत जाऊन त्याचा काय उपयोग? कुणी सेवेकरी भिक्षां देई आहे काय? आजचा हा आनंदाचा दिवस आहे. काही पाठीमागच्या गोष्टी सांगतो. सेवेकऱ्यांचे कर्तव्य पाहून मला नजर फिरवावी लागते. येथून पुढे तरी सेवेकर्‍यांनी सुधारण्याचा प्रयत्न करावा. म्हणूनच आपण आज जे स्पष्टीकरण केले त्यातच जर सेवेकरी रममाण झाला तर मी दूर नाही. मग मात्र मी त्यांच्या वेगळा नाही. क्षणोक्षणी तो मला पाहू शकतो. हे सर्व अखंड नामातच आहे. त्याला खरे नाव काय, तर जे म्हणाल ते ! मानव मायेत गेला तर ते नाम म्हणून म्हटलेले आहे. अनंत नामे अनंत रुपे, असा मी आहे. मला जागृत ठेऊन घंटानाद ऐकला तर कोणत्याही संकटात सापडणार नाही. आत्मजागृतीचा घंटा नाद कोणी ऐकला आहे का? (समाप्त) ©️

You cannot copy content of this page