आज आपल्या आदेशाप्रमाणे मी जरी ब्रह्म असलो, तरी मी ज्यांना शरण आहे, तेच परब्रम्ह सर्व व्यापक असून अलिप्त पण आहे. आम्ही ॐ कार स्वरूप जे बनलो, ते त्या परब्रम्हाच्या, सताच्या कृपेनेच बनलो. आमच्या असंख्य चुका झाल्यात, त्या सुधारण्याच्या मार्गाला आम्ही लागलो, ते सुद्धा त्या सताच्याच कृपेने!
आम्ही करणारे कोण? त्याचप्रमाणे पृथ्वीच्या पृष्ठभागावर मानव आहेत ते आकारी आहेत, तसेच आम्ही देखील आकारी होतो आणि आहोत. त्याचप्रमाणे सर्व मानव सेवेकरी आकारी आहेत. म्हणून आपण ज्यांना शरण आहात तेच परब्रम्ह जाणून, त्या ठिकाणीच अखंड श्रद्धेने रहा अन् त्या आकाराची पूजा करा. अशा तऱ्हेने आकाराची पूजा केल्यानंतर त्या आकाराच्याच कृपेने ॐकार स्वरूप प्राप्त होते. म्हणून सद्गुरु कृपेने ॐकार स्वरूप बनण्याचा प्रयत्न करा.
या ठिकाणी येण्याचे कारण काय, ते येथील भक्तांनी जाणून घ्यावे. या ठिकाणी कोण आहेत? कोणाला पाहता येते तर कुणाला नाही. म्हणून अजूनही चुकू नका. आकार कशासाठी? कोणत्या कारणासाठी हे येथील सेवेकर्यांनी ओळखून घ्यावे. हेच शुभदिनी संदेश आहेत. (समाप्त)©️
