Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ मालिक – ज्याच्या त्याच्या योगा प्रमाणे सद्गुरु चरण प्राप्त होतात. त्याची तळमळ मात्र पाहिजे. नाही पेक्षा हल्लीचा काळ फार वेगळ्या …

श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरु प्रिय जी ज्योत, सदोदीत सद्गुरु दर्शनात असेल, सद्गुरुंनी सांगितलेल्या मार्गाने जाणारी, सद्गुरुंशी व्यवहार करणारी ज्योत, …

आसन महाराष्ट्र भूमीसाठी कर्तव्याने झगडले आहे. नाना तऱ्हेची शुद्धीकरणे झाली आहेत. ही महाराष्ट्रभूमि शापदग्ध होऊन हजारो वर्षे लोटली आहेत. अनेक वेळेला निवेदन …

“जे प्रत्यक्ष पाहत आहेत ते मानव धन्य होत.” सता या भूतलाचेच कर्तव्य नसून पूर्णत्व विश्वाचे कर्तव्य करावयाचे आहे. प्रत्येक अवतारकार्यात या भूतलाचेच …

आज अनंताशी उलट सुलट बोलण्याचा प्रयत्न केला व मागणे मागितले पण त्यांचा एकच भाव,”सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेवांचे उदाहरण दिले. …

गुरुदेव पितामह म्हणतात, “अनंतांचा एकच भाव आहे, सत सोडून असत घेणे.” त्यासाठी त्यांनी गुरुदेव पितामहांचे उदाहरण दिले. म्हणाले, “पितामह कहर झाला तरी …

महामुनी, सप्तऋषी सानिध्यात आहेत. मानवी शुद्धीकरण दिलेले आहे. त्याचा रोख असा…. एक ज्योत सानिध्यात, पण त्यांच्या सानिध्यातील सर्वच ज्योती सात्विक अशी गती …

राम अवतारात मानवी स्थितीला पूर्णत्व कल्पना होती की राम अवतार हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सता आपणास कल्पना आहे या स्थितीमुळे कर्तव्याला …

सत् भक्तीचा प्रकाश – ©️

सत् भक्तीचा प्रकाश – ©️

सत मार्गाने जाणारा मानव हा पूर्वजन्मीच्या संचिताप्रमाणे जात असतो. नवमास भरल्यानंतर तो जन्माला येतो. त्यावेळी त्याला नाव गाव काही सांगितले नाही, कोणाचा आहे हे सांगितले नाही. १८ वर्षाचे वयात आल्यानंतर तो लगेच भक्तीला लागला आहे का? जर त्याची भावना शुद्ध सात्विक असेल, अन त्याच्या मनात जगात ईश्वर आहे ही भावना निर्माण झाली, मगच तो भक्तीने जाण्याचा प्रयत्न करतो.

सत् भक्तीचा प्रकाश म्हणजे पाचवा वेद आहे. पाचवा प्रणव आहे. असा तो ज्ञानमार्गाने जाऊ लागला तरी पूर्वजन्मीचे गाठोडे असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. प्रथम तो पोथ्यापुराणे वाचतो. काही पुस्तके वाचतो. तदनंतर त्याला भक्तीचे वळण लागते. नंतर तो गुरु करण्याचा प्रयत्न करतो. सद्गुरुना शरण गेल्यानंतर त्याला ज्ञानाची म्हणजेच प्रकाशाची प्राप्ती होते. तो प्रकाशित होतो. त्या प्रकाशाच्या अनुसंधनाने वाटचाल करतो. नंतर त्याला स्वरूपी जाणीव मिळते. सूक्ष्माची गती मिळते. मग कारणाची आणि तदनंतर महाकारणाची गती मिळते. नंतर तो पात्र झाल्यावर अणू, रेणू, परमाणुची गती मिळते. पण कसे? तर तो आकाराच्या अनुसंधनानेच वाटचाल करतो व निराकार तत्वाची ओळख करून घेत असतो.

अशा रीतीने त्या ठिकाणी गेल्यानंतर, तो काय सांगणार आहे मी कुठे आहे? काय आहे? रूपात आहे की अरुपी आहे? काय सांगणार आहे तो? बोलता चालता सांगता येणार नाही. मात्र त्या पात्रतेची ज्योत असेल तर ! सत् हे आकारी आहे आणि निराकारी पण आहे. आकारात चुपचाप राहुल सर्वस्व कारभार करीत असतात. पण त्यांची ओळख अद्यापी कुणी करून घेतली नाही. निर्गुण जर नसेल तर सगुणाला काय किंमत आहे? म्हणून सगुणही मीच अन् निर्गुणही मीच !

संतांनी असे म्हटले आहे, पण केव्हा अन् कधी? हा प्रश्न आहे. ज्या वेळेला जडत्वाचा विसर पडेल, त्या वेळेला आकारी अन् निराकारी एकच असते ह्याची जाण होईल, पण जडत्वाचा पूर्णत्वाने विसर पडेल तेव्हा ! सद्गुरु चरणात पूर्णत्वाने लिन झाले मग मात्र सगुण, निर्गुण, मी, तू एकच आहे असे त्यावेळी म्हटले जाते. तोपर्यंत काही सांगता येत नाही. त्याला काही वर्षे लोटावी लागतील. मग मात्र भक्तीत मिलन झाला असे म्हणता येईल. ©️

You cannot copy content of this page