Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

तपश्चर्या करायला हल्लीच्या कलियुगात मानवाकडे वेळ आहे का? तपस्या करायाची असेल तर सर्वस्वी त्याग करावा लागतो. भक्तीचे तसे नाही. भक्ती करताना संसाराचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – गेल्या २५ अवतार कार्यात ज्या अघोरांचा नाश स्थूलाने केला त्यांचा नाश सूक्ष्माने करणे तुम्हा मानवांना …

अनंतांनी आमच्या गृहाला नाव दिले आहे,”मुळाश्रम”, पितामहांनी देखील नाव दिले आहे,” मुळाश्रम”! अनंतांनी त्याला मुळाश्रम का म्हटले त्याचे कारण अजून माहित नाही. …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, सज्जन ज्याप्रमाणे भक्तिमार्गाने जातात त्याप्रमाणे तू ही वाटचाल …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – काही काही सेवेकरी म्हणतात,” बाबा, आम्हाला अजून प्रकाश नाही, प्रकाशाची गती मिळत नाही.” त्यावेळी सद्गुरू …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – अशा त्या सद्गुरूं बद्दल आपल्या मनात सदभावना निर्माण व्हावी ही इच्छा! मनाने आकारल्याखेरीज ते तत्व …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सेवेकरी म्हणतात” बाबा आम्ही तुम्हाला बंगला बांधून देतो पण बाकीचे आमच्याकडे राहू दे. ”अरे सेवेकर्‍यांनो, …

भक्ती आहे साधी, सोपी, सोज्वळ, सरळ ©️

भक्ती आहे साधी, सोपी, सोज्वळ, सरळ ©️

श्री समर्थ मालिक – सर्वांच्या हृदयी सत आहे. परमेश्वर सर्व व्यापक आहे. पण तो कोणत्या गतीने, त्याचे वर्णन काय? मानवाने पाहिले म्हणावे, तर तो मार्ग विसरतो कां?

प्रकृती आहे. ही प्रकृती किती तऱ्हेने नटलेली आहे? सेवेकऱ्याने प्रकृतीचा तरी अंत घेतला आहे का? प्रकृतीला जर अंत नाही, मग अंत लावू शकता का? प्रकृतीला भ्रांती घालून माझा शोध लावला आहे का? तर नाही. जितक्या ज्योती, तितक्या प्रकृती, आपल्या मनाप्रमाणे मार्ग आक्रमित असतात. प्रत्येक मानव आपल्या मनाप्रमाणे समजत असतो की, मी कोणीतरी विशेष आहे. प्रत्येक जण असल्या मताचे प्रतिपादन करीत असतात. एकाच मताने सर्वजण वाटचाल करतील, तर भिन्नत्व निर्माण होईल का? म्हणून सेवेकऱ्याने अभिन्न बनण्याचा प्रयत्न करा.

मायेचा अंत सापडलेला नाही. आसनाधिस्त हे साधेसुधे तत्त्व नाही. त्याना कोणीही ओळखले नाही. करूनही अकर्ते असे तत्त्व आहे ते ! तेथूनच प्रणव, बोल निघतात, म्हणून त्या तत्त्वाच्या दोन गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात.

मानवाकडून, जडत्वाकडून असत कृतीची भरपाई झाल्याशिवाय सत् त्याला हात घालत नाही. भरपाई झाल्यानंतर त्याला विलंब नाही. कोठून चक्र फिरुन तो खड्ड्यात पडेल त्याचा अंत मिळणार नाही. म्हणून सेवेकऱ्याने सुखदुःखाची व्याख्या करून, ती त्याने आचरणात आणावी. भक्ती, ही साधी, सोपी, सोज्वळ,‌ सताच्या सानिध्यात आहे. त्या सत, साध्या भक्तीने जाल, तरच सुख मिळवाल, जर मनाची चंचलता वाढली तर ती कृती तुम्हालाच जाचक होईल.

संतांनी असे म्हटले होते, “कितीही दुःख झाले तरी, नाम घेतल्याविना राहणार नाही.” तरी यावर आपण विचार करावा. (समाप्त)©️

You cannot copy content of this page