Skip to content Skip to footer

परमपूज्य श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज ट्रस्ट

15

Blogs

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – तुम्ही पाहता, अनुभवता की इथे लाखो वर्षे तपश्चर्या करणारे ऋषीमुनी सानिध्यात येऊन जातात, सानिध्यात वावरण्याचा …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – सद्गुरुंचा सेवेकर्‍यावर विश्वास असतो, त्याची परिपूर्णता करणे प्रत्येक सेवेकऱ्याचे आद्य कर्तव्य आहे. या विश्वासाला तडा …

सद्गुरु प्रणवांचा अर्थ तुम्ही जाणला आहे का? सद्गुरु प्रणव हे अमृतमय प्रणव आहेत. ते सेवेकऱ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी समजावून सांगतात. जर सद्गुरूंनी …

श्री समर्थ सद्गुरु स्वामी भगवान महाराज – एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल, तर …

श्री समर्थ मालिक – आकाराशी संधान बांधल्या शिवाय निराकारापर्यंत वाटचाल करता येणार नाही. निराकारी कोण? आकारी कोण? तदनंतर याची गती आपोआप मिळेल. …

सुख आणि दुःख -२©️

सुख आणि दुःख -२©️

काही सेवेकर्‍यांनी किती कर्तव्य बजावले आहे? तर शून्य ! कर्तव्याची वाटचाल थोडी पण बडबड जास्त असते, म्हणून सेवेकऱ्यांनी जर शंका आणल्या तर त्या सद्गुरूंना माहीत असतात. जे काही करतो ते सर्व सद्गुरु जाणतात. थोडासा त्रास सहन केला पाहिजे, म्हणून त्या संतांनी असे म्हटले आहे. पूर्वीच्या संताप्रमाणे कृती करा अन् चौकटीत बसा.

सेवेकरी कसाही असो, सद्गुरु जितके कठीण तितकेच लोण्यापेक्षाही मऊ आहेत. त्यांच्या आदेशाप्रमाणे सेवेकरी वाटचाल करू लागला, तर ते कधीही कठीण होणार नाहीत. सेवेकऱ्यांचे, सर्वस्वांचे निधान या ठिकाणी आहे हे ध्यानात ठेवा. म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी सावधगिरीने वागावे.

तुम्ही नामात दंग राहिलात, मग कुठेही जा, ते तुमच्या पाठीशी आहेत. म्हणून आदेश, प्रणव तीन ताळ, सप्त पाताळ, २१ स्वर्ग घुमत असतो. अघोरांनी किती जरी थैमान घातले, तरी अंती विजय सताचाच आहे. आता जे चालले आहे, ते असेच आहे.

राम अवतारात, कृष्ण अवतारात कर्तव्य झाले. सद्गुरु आदेश, संदेश जोपर्यंत स्थूलांगी सद्गुरु येथे आहेत, तोपर्यंत साधा, साधून घ्या. याची खूणगाठ बांधा. एकदा का फिरतीवर गेले की तुम्ही या म्हटले तरी येणार नाहीत. उद्या ते फिरतीवर गेल्यावर मग दरबारच दरबार ! कित्येक वेळेला संदेश दिले की, अघोरांबरोबर सतालाही त्रास होईल, म्हणून अघोरी अघोराने खेळ खेळते. सत् सताने खेळ खेळते. (समाप्त) ©️

You cannot copy content of this page