प्रार्थना – प्रा म्हणजे काय? प म्हणजे काय? ना म्हणजे काय? प्रार म्हणजे काय? आणि थ म्हणजे काय? न म्हणजे काय? म्हणजेच परात्पर, चराचर, क्षराक्षर असे ते परात्पर तत्व !
परात्पर तत्व ! ते कोणी निर्माण केलेले नाही. घडविलेले नाही. घडविणारा नाही. असे तत्व त्याला प्रार्थ असे म्हटले आहे. प्रार्थना म्हणजे ज्याचा अर्थ लागत नाही असे तत्व.
ना म्हणजे नाव नाही, गाव नाही, ठाव नाही, ठिकाणा नाही, रंग नाही, रूप नाही, रेषा नाही, आकार नाही, विकार नाही असे ते तत्व आहे !
पण प्रार्थना याचा अर्थ काय? तर त्याला अर्थच नाही. रूप नाही, रेषा नाही, आकार नाही विकार नाही असे तत्व !
परात्पर, क्षराक्षर भरूनही उरलेले तत्व ! अनंत रूपे, अनंत नामे धारण करणारे असे ते तत्व आहे.
प्रार्थना हा शब्द कोणी निर्माण केला? तो शब्द का निर्माण व्हावा? कशासाठी निर्माण केला? परात आहे, क्षरात आहे, अर्थामध्ये आहे, अनर्थात आहे आणि असूनही नसून अलिप्त आहे. मात्र आहे कुणाला नाही कुणाला याचा ठाव ठिकाणा लागलेला नाही. (पुढे सुरु……२) ©️
