तुकाराम महाराज – “ब्रह्मानंदी लागली टाळी। कोण देहाते सांभाळी ।।’’ ही टाळी लागल्यानंतर नारायणाला शोधण्यास कोठेही जावे लागत नाही. स्वर्गात, मृत्यूलोकात कोठेही जावे लागत नाही, तर त्याचे अस्तित्व सतशुद्ध (चरणातच) अंत:करणात असते. त्याला शोधण्यासाठी सतशुद्ध आचरण ठेवले पाहिजे, मग अनंत लांब नाहीत. त्याचे साधन एकच हे नाम आहे. सतशुद्ध सात्विक आचरण आहे. अशा तऱ्हेने नाम घेतो, त्याच्यासाठी नाम आहे. ते सद्गुरु मुखातूनच मिळावयास पाहिजे. ज्याला ते मिळाले तो पांडुरंगमयच होतो. ज्याचे मन पांडुरंगमय झाले, त्याच्याच शोधात पांडुरंग असतात. बसल्या ठिकाणी गती देऊन विलीन करून घेतात.
विचलित झालेली मानवांची मने स्थिर करण्यासाठी, मी किर्तन करीत होतो. यासाठीच मला पाठविले होते. श्रवण, मनन, कीर्तन ही प्रथम पायरी आहे. या ठिकाणची (दरबारची) गती ही पुढची पायरी आहे.
कीर्तन ही प्रथम पायरी आहे. अभंगातून नामाचा महिमा अगाध आहे हेच सांगितले आहे. सत शुद्ध अंतःकरणाने विधीयुक्त रितीने साठा केला तर अनंत लांब नाहीत. तो भक्त त्यांना शोधीत नाही, तर प्रत्यक्ष पांडुरंग भक्ताला शोधत येतात, असे ते एकच बीज आहे. ते सर्वत्र विखुरले आहे. असा नामाचा महिमा आहे. भक्तीचे साधन नाम आहे. भक्ती कठीण नाही. एकच, एकाग्र चित्ताने चिंतनमय होऊन, नाममय होणे, मग अनंत दूर नाहीत. या ठिकाणी जे सत भक्त आहेत, ज्यांना सत सानिध्य प्राप्त झाले आहे, या ठिकाणी अखंड नामाचा प्रवाह आहे. ज्यांना हे नाम मिळाले ते सतगतीत गेल्याशिवाय कधीही राहणार नाहीत. (समाप्त) ©️