सेवेकरी म्हणतात कि, मालिक तुम्हीच करून घेणार आहात. पण हे तत्व कसे आहे कि, यात कोणीही मिलन होऊ शकणार नाही. सतमय जे आहे तेच सत् ! तेच ब्रह्म ! तेच समर्थ ! आपल्यातच आहेत. तेच आपणाला उपदेश सांगतात. म्हणून दिलेला अखंड नामाचा उजाळा करणे. पण ते कोणी करीत नाही.
स्थुलाला स्थुलाची जशी आवश्यकता आहे, तशी स्थुलाला चंदनमय बनण्याची सुद्धा आवश्यकता आहे. ते चंदनमनय बनविण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत चेतना तोपर्यंतच आपण, आप आणि पर म्हणतो. पण ती चेतना शक्ति कोणाच्या कृपेने आहे, तर सताच्या, समर्थांच्या कृपेने ही चेतना शक्ती आहे. ही चेतना शक्ती बाहेर पडली तर मग स्थुलाचा काही उपयोग नाही. म्हणून समर्थ म्हणतात, “मी तुमच्यातच वास करीत आहे. हे जडत्व दिले ते मला पाहण्यासाठीच दिले आहे. जर पाहता आले नाही तर हे सर्वस्व निष्फळ आहे.”
जडत्व आहे ते बुद्धिवान पाहिजे. जागृत पाहिजे. सन्मार्गी ज्योत सदा जागृत असते. ती क्षणिक लोभाला फसणार नाही. मोहाला फसणार नाही. जड मौलिक आहे, तर जडासाठी तहानलेले असले पाहिजे की नाही? जड आहे तर भक्ती आहे. ©️