जो सेवेकरी सत् मार्गाने चालला आहे, तो मात्र शुद्ध अंतःकरणाने लीन होऊन सत् गतीने वाटचाल करतो, तोच ओळखू शकतो, करतात ते मालिक करतात. मी निमित्त आहे. असे जेव्हा सेवेकरी म्हणेल, मग मात्र त्याला बोधामृत चाखावयास मिळेल. सेवेकऱ्यांनी आपल्या कर्तव्यात (नामस्मरणात) जागृत राहणे, त्याचा उजाळा करणे. त्याचा उजाळा झाला की, प्रकृतीचा उजाळा होतो. प्रकृती जोपर्यंत अभिन्न होत नाही, तोपर्यंत मन अभिन्न होत नाही. मन जर भिन्न ठेवले, तर सर्वच भिन्न दिसेल. मनाला अभिन्न बनवा हेच संदेश आहेत.
सत भक्तीसाठी प्रकृतीमध्ये एवढे स्नेह आहेत, ते सत चरणात निमग्न होऊन ओलावले असतील, तर एकाच ठिकाणी स्थिर राहतात. मन अमृतमय झालेले असते. रसना, प्रेम जर अमृतमय झाले, मग मन कोठे जाईल? जी इंद्रिये आहेत, ती सद्गुरुमय झाल्यानंतर इकडे तिकडे होतील का?
भक्तिला प्रथम प्रेम पाहिजे. ते प्रेम शुद्ध असेल तर मन आकळता येते. स्नेह अमृत झाल्यानंतर……. मग तो पाझर फुटतो तो कोठे जातो? १७ वी जीवनकळा कोठून सुटते? सर्वस्व स्नेह ओलावले, तन्मयता साधली, पूर्ण निमग्न झाला कि नंतरच १७ वी जीवनकळा सुटल्यानंतर तो पाहू शकतो. त्या सुखासाठी, रसना ओलावली पाहिजे. मन शुद्ध झाले पाहिजे. पुढे सुरु…..२ ©️