पूर्वी भक्तीला जरी त्रास होत असला तरी त्याला प्रतिसाद मिळण्याला बरीच मदत होत होती. हल्ली भक्ती करणारे फारच तुरळक आहेत. जरी असले तरी त्यांची निंदा नालस्ती होते आणि परिस्थिती ही प्रतिकूल आहे. पूर्वीपेक्षा हल्ली भक्ती साधी आणि सोपी आहे. तसे पूर्वी नव्हते. पूर्वी फार कसून घेतले जात असे. हल्ली तसे कसून घेतले जात नाही.
पूर्वी एखादे कार्य करीत असताना मदत केली जात असे. तशी आताची परिस्थिती नाही. ज्याला भक्तीची चव समजली त्याला अडचणी फार निर्माण होतात. तरी सुद्धा आपले पाऊल वेडे वाकडे न पडण्याची तो दक्षता घेतो. जे विरोधक असतात त्यांची तो तमा पाळत नाही.
आपणाला सांगितल्याप्रमाणे तो सेवेकरी वाटचाल करतो. त्यातूनही एखादा सेवेकरी आत बाहेर करत असेल, तर त्याला अडीअडचणी निर्माण होतात. कारण त्याची अढळ श्रद्धा नसते. श्रद्धा जर अढळ असेल तर तो वाटेल त्या अडीअडचणीतून निभावून जातो. हे सेवेकऱ्याच्या अढळ श्रद्धेचे फळ आहे.
सद्गुरु कोणाचेही ऋणी नाहीत. पूर्वजन्मीचे जे देणे, ते देऊन टाकतात. त्याचा उजाळा करणे हे प्रत्येक सेवेकऱ्याचे कर्तव्य आहे. ते त्याच्यात भर टाकतील तर सुखी होतील.
प्रत्येक सेवेकर्यांनी जरी अडी अडचणी आल्या, कोणी काहीही बोलले तरी आपली चाकोरी सोडावयाची नाही. आसनाधिस्तानी जे सांगितले, बोधामृत पाजले, त्याची सतत आठवण ठेवून त्याप्रमाणे वागणे. तो येथे सेवेकरी तर बाहेर सद्गुरू पदाने वावरला जातो. कारण येथील प्रत्येक बोल अनुभविक आहे. येथे प्रत्यक्ष अनुभव दिला जातो, नंतर सांगितले जाते. (पुढे सुरु…….२)©️