सद्भावनेने, भाविकतेने ज्या ज्योतीने जे बहाल केलेले आहे ते समाधीवर रुजू होणारच. पूर्ण श्रध्देने केलेले कार्य, कोणते कां असेना सद्गुरु चरणांवर रुजू होते. त्यामध्ये सद्भावना सतगती नसेल तर ते होणार नाही.
मनुष्य हाच ईश्वरी अवतार आहे आणि त्यातच सर्वस्व बीजारोपण आहे, पण मानवाला त्याची जाणीव नसते. त्याची जाणीव होण्यासाठी मनुष्य देह आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणाचा अवतार आहे याची गती मिळाली मग त्याची सेवा रुजू होते. माझ्या अंत:र्यामी कोण आहे याची गती मिळेल व त्या गतीने जो जाईल, तरच सर्वस्व होईल.
मानवाची मानवता सिद्ध करण्यासाठी, ज्यांनी हे सर्वस्व निर्माण केले, त्यांना डोळे भरून पाहणे व त्यांची सद्भावनेने गती घेणे हे आद्य कर्तव्य आहे. मायावी गती सांभाळून सद्भावनेने, भाविकतेने, सत गतीने जाईल, तर त्याला साध्य होण्यास विलंब नाही. या गतीने आचरण पण पाहिजे.
आपणाजवळ कितीही ज्ञान असले तरी त्यांची जोपासना करण्यासाठी सद्गुरु पाय धरावे लागतात. आपली पण तिच स्थिती आहे. ती सहज साध्य नाही. त्यासाठी कोणाला तरी मानावे लागते. कोणतीही गती पाहून भागत नाही. त्याला प्रत्यक्ष काठीचा आधार घ्यावा लागतो आणि ही काठी म्हणजे साक्षात आपले सद्गुरु !!! (समाप्त) ©️