आत्मा बाहेर पडताना, प्रकृती अंगापासून बाजूला होताना, त्यावेळेस ज्योतीला तेज चढते. बाजूला झाल्यावर ज्योत निस्तेज बनते. ती कां? अविनाशी आत्मा हृदयरुपी पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर तेज कोठून राहणार? हा आत्मा आहे तोपर्यंत चलन वलन राहते.
मानव जर ईश्वर असेल, तर त्याची ही स्थिती का असावी? अविनाशी आत्मा शांत असतो. मानवांची मने, त्याप्रमाणे ते स्थिती करून घेतात. त्याला मालिक काय करणार? मानव ईश्वर तो कसा? पाहण्याची धडपड करा. नामस्मरणात दंग व्हा.
अविनाशी आत्मा प्रगट होतो. तो प्रगट होण्यासाठी काय करावे? मानव असत कृतीने गेल्यास तो प्रगट होत नाही. सर्वस्व सत् गतीने गेल्यास तो प्रगट होतो. जो बोल बाहेर फेकला, तो बोल शेवटपर्यंत कायम ठेवा. ठामपणा ठेवा. कार्य प्रविण होईल. प्रत्येक बोलाला महत्व असते. तो बोल म्हणजे ब्रह्म बोल होय. मानवाना कळत नाही. जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत आपली कृती काय? हे त्याला कळत नाही. याची जाणीव त्याला होत नाही. जन्माला आल्यापासून अविनाशी आत्मा बाहेर पडेपर्यंत त्याचे दर्शन एकदा तरी घेणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. (१)©️