समर्थांचे समर्थ फार निराळे आहेत. लाखों समर्थ निर्माण करण्याची त्यांची ताकद आहे. त्यांची शक्ती आम्हाला कशी अजमावता येईल?
ते राम फार निराळे आहेत. तेच समर्थांचे समर्थ होय. या दासाला क्षमत्व असावे. समर्थ कोणाचे समर्थ? हे समजत नाही. या आसनाचे समर्थ फार निराळे आहेत. परंतु फार दयाघन आहेत. त्यांच्या अमोघ शक्तीचे मोजमाप कोण करणार? त्यांचा अंत नाही. ते समर्थ फार वेगळे आहेत.
या आसानासमोर क्षमा मागण्याचा मला अधिकार आहे. मी कोणत्या आसनाची क्षमा मागत आहे? हे आसन अनंत आणि ठाम, सत् आसन आहे. त्याचा अंत कोणी लावणार नाही. आसन आदीअंता पासूनचे आहे. त्याच्या शिवाय उत्पत्ती, स्थिती आणि लय कोणी करणार नाही. ते आसन कोणीही तयार केले नाही अगर करविले नाही.
मालकांचे आसन आहे. त्याचा मी दास आहे. ते समर्थ फार निराळे आहेत. रंग, आकार, विकार नाही. असे ते दयाघन, त्यांचा अंत नाही. या आसनासमोर मी एक कण आहे. त्यांच्यासमोर क्षमा मागण्याचा मला अधिकार आहे. ©️