आपले माता – पिता हे ही त्याप्रमाणे आहेत. परंतु गुरू पेक्षा माता -पिता श्रेष्ठ म्हणावे तर आयुष्याचे कोटकल्याण करणारे फक्त गुरूच आहेत. माता पित्याची पायरी सद्गुरुंच्या खालची आहे. हे सत्य आहे.
परंतु गुरू सुद्धा त्या पातळीचे पाहिजेत. आपण प्रथम गुरु करतांना, प्रथम विचार केला पाहिजे. या मार्गाने कितपत पोहोचू. कितपत नाही. याचा विचार आपण केला पाहिजे.
आयुष्याचे कोटकल्याण करील तेच गुरु होय आणि त्यानाच शरण गेले पाहिजे. परंतु ह्या काळामध्ये थोडे आहेत. ज्याला आपण शरण जातो, ते केव्हाही आपणाला मरण देणार नाहीत आणि गुरू जे करतात ते आपल्या शिष्याच्या कोटकल्याणासाठीच झटत असतात. परंतु असे ह्या काळात थोडे आहेत आणि जे थोडे आहेत, त्यांना तुच्छ समजून असत मार्गानेच जाणारे पुष्कळ आहेत.
प्रत्येक मानवाने विचार करून प्रत्यक्ष गुरु माऊली अंत:र्यामी ठेवली पाहिजे. तेच साक्षात परमेश्वर समजून पूजा केली पाहिजे. माझे प्रथमचे गुरुबंधू ज्ञानेश्वर हेच होय. आम्ही कोठेही असलो तरी एकमेकांना केव्हाही विसरू शकलो नाही. आमच्या मनात एकही विचार नव्हता की आम्हीं भक्ती मार्गाला लागू. भक्ती करू. परंतु आमच्या भावाने ज्ञानेश्वरांने भक्ती मार्ग दाखविला. म्हणून ह्या स्थळी आहोत. त्यांचे उपकार जन्मोजन्मी फिटणार नाहीत. कोठेही जाणे झाले, तर प्रथम त्यांची भेट नंतर पुढे पाऊल. आमच्या चौघांपैकी एक जरी आला नाही तरी आम्ही शोध करतो. आम्ही चौघे खेळीमेळीने राहतो.
ज्ञानेश्वरांने आमच्या करीता पुष्कळ कष्ट केले. पुष्कळ त्रास सोसला. स्वतःचा देह झिजविला आहे. गुरू, माता, पिता सर्वस्व तेच आहेत. त्यांचे वर्णन करावे तेवढे थोडे आहे. जर त्यावेळी आमचे पालन पोषण केले नसते, तर आम्हाला हा मार्ग मिळाला नसता आणि आमची स्थिती कशी झाली असती, ते आपणच समजा. आमच्या पदरचे काही नाही. हे सर्व त्यांचेच आहे. ©️
(समाप्त)